दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा: इ.स.१९९२ मध्ये ....... या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली.
(अ) महाराष्ट्र
(ब) गुजरात
(क) आंध्र प्रदेश
(ड) उत्तराखंड
Answers
इ.स.१९९२ मध्ये आंध्र प्रदेश या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली.
१९९२ साली महिलांच्या पुढाकारमुळे आंध्र प्रदेश सरकारने सगळ्या प्रकारच्या मद्यपानावर बंदी आणली आणि मद्य प्राशन करणे हा गुन्हा समजला जाऊ लागला. मद्य प्राशन केल्यामुळे काही महिलांचे पती त्यांना आमनुष मारहाण देखील करत असत तसेच त्यांच्या पगारातील सर्व पैसे ते या मद्यवर घालवत असत . त्यांचा हा अत्याचार आंध्र प्रदेशातील महिला सहन करू शकल्या नाहीत आणि त्यांनी मद्यवर बंदी यावी या करता आंदोलन आणि मोर्चे काढले अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि राज्यात मद्य बंदी सुरू झाली .
उत्तर- इ. स. १९९२ मध्ये आंध्र प्रदेश या राज्यात मद्यपानविरोधी चळवळ सुरू करण्यात आली.
मद्यपणाच्या व्यसनामुळे घरातील कर्ता पुरुष अकाली मृत्यू पावल्यास घरातील अन्य सदस्यांवर संकट ओढवते.याचा सगळ्यात जास्त त्रास स्त्रियांना होतो.दारूमुळे दुःख, दैन्य यांचा सामना करावा लागतो. आंध्र प्रदेशात सरकारी धोरणामुळे अरक विक्रेत्यांनी गावोगावी दारूची दुकाने उघडली.गावोगावची गरीब,कष्टकरी जनता आहारी जाऊ लागली.याचवेळी राज्यात साक्षरता कार्यक्रम खेड्यापाड्यात राबवला जात होता. या कार्यक्रमात सिताकथा सांगितली जायची सीता गावकऱ्यात जागृती निर्माण करून दारूला कशी अटकाव करते हे या कथेत सांगितले जायचे.
धन्यवाद...