Social Sciences, asked by PragyaTbia, 1 year ago

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा: भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश -(अ) पाकिस्तान व चीन(ब) नेपाळ व भूटान(क) म्यानमार व मालदीव(ड) अफगाणिस्तान व अमेरिका

Answers

Answered by sonali3971
6
a.......is your answer
Answered by gadakhsanket
7

★उत्तर- भारताशी तणावपूर्ण संबंध असणारे देश पाकिस्तान व चीन हे आहेत.

भारताशी पाकिस्तानचे तणावपूर्ण संबंध असण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.

१)परस्परांविरुद्ध असलेले दृष्टिकोन.

२)काश्मीर प्रश्न.

३)अण्वस्त्रविषयक संघर्ष.

४)'सर क्रीक'सागरी क्षेत्रातील सीमेविषयीचा वाद.

५)दहशतवादी कारवाया.

भारत चीन तणावपूर्ण संबंध असण्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत.

१)तिबेटचा दर्जा :तिबेटमधील चीनचे लष्करी नियंत्रण वाढत चालल्याने दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेतला.हि गोष्ट भारत - चीन संघर्षाला कारण ठरली.

२)सीमा प्रश्न : अरुणाचल प्रदेशावर चीनचा दावा आहे.त्यावरून १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले होते.

धन्यवाद...

Similar questions