India Languages, asked by archanaohol10, 5 hours ago

दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य स्पष्ट करा​.( आहे कृपया करून मराठी भाषेतच उत्तर द्यावे)

Answers

Answered by sonunimbajiwakode
24

महालातील धनदौलत ही बंदिस्त असते. तिजोरीला भक्कम कडीकुलूप लावलेले असते. चोरी होऊ नये; म्हणून धनावर सक्त पहारे ठेवले जातात. संपूर्ण महाल कडेकोट बंदोबस्तात असतो. कवी म्हणतात – माझी झोपडी सदैव खुली असते. धनदौलत नसल्यामुळे माझ्या झोपडीचे दार दोऱ्यांनी, कड्याकुलपाने बंद करावे लागत नाही. झोपडीला चोराचे भय नाही. येथे आनंदाने सर्वांचे स्वागत करण्यासाठी माझी झोपडी सताड उघडी असते. या ओळीतून कवीच्या मनाचा मोठेपणा व्यक्त झाला आहे.

Explanation:

correct answer for your question please rao Brainlist Mark kar.

Similar questions