उपक्रम : सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.
Answers
सैन्यात भरती झालेल्या मुलाच्या आईची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न पुढील प्रमाने आहेत.
१. तुमचा मुलगा सैन्यात भरती झाला आहे, तुम्हाला कसं वाटतंय?
२. लहानपणापासून त्याला सैनिक व्हायचं होतं का?
३. तुमचा मुलाच्या स्वप्नाला तुम्ही कशा प्रकारे पाठिंबा दिला?
४. सैन्यात भरती होण्यासाठी तुमच्या मुलाने काय काय परिश्रम केले?
५. तुमचा मुलगा देशाचे रक्षण करणार ही भावना कशी व्यक्त कराल?
६. जर तुमचा मुलगा सैनिक झाला नसता तर त्याने काय करावं असं तुम्हाला वाटतंय?
७. तुमच्या कुटुंबात कोणी सैन्यात आहे का?
८. तुमचा मुलगा घरापासून, तुमच्यापासून दूर आहे, तुम्हाला त्याची आठवण आली कि काय करता?
९. तुमच्या मुलाला सैन्यात भरती होण्याची प्रेरणा कुठून मिळाली?
१०. सैन्यात भरती होऊ इच्छित असणाऱ्या मुलांच्या पालकांना तुम्ही काय संदेश द्याल?
Explanation:
तुमचा मुलगा सैन्यात भरती झाला आहे तुम्हाला कसं वाटतय