(८) विरुद्धार्थी शब्द लिहा.
(अ) अवरोह x(आ) अल्पायुषी x(इ) सजातीय x(ई) दुमत x(उ) नापीक x
Answers
"नमस्कार,
दिलेले प्रश्न मराठी कुमारभारती (१० वी) या पुस्तकातील 'काळे केस (लेखक- ना. सी. फडके)' या पाठातील आहेत. या पाठात पांढऱ्या होत जाणाऱ्या केसांबरोबर विचार करणे या माणसाच्या प्रवृत्तीचे वर्णन केले आहे.
★ विरुद्धार्थी शब्द -
(अ) अवरोह x आरोह
(आ) अल्पायुषी x दीर्घायुषी
(इ) सजातीय x विजातीय
(ई) दुमत x संमत
(उ) नापीक x सुपीक
धन्यवाद..."
(८) विरुद्धार्थी शब्द लिहा.
खालील दिलेले विरुद्धार्थी शब्द इयत्ता दहावीच्या कुमारभारती या पुस्तकातील "काळे केस" या पाठातील असून याचे लेखक ना. सी. फडके हे आहेत .या पाठात लेखकांनी पांढऱ्या होत जाणाऱ्या केसांबरोबर विचार करणे या माणसाच्या प्रवृत्तीचे वर्णन केलेले आहे तसेच व्यक्ती तेवढ्या प्रव्रुत्तीची जाणंही आपणाला या पाठातून होते .
(अ) अवरोह x आरोह
अवरोह म्हणजे वरून खालच्या दिशेला येण्याची क्रिया व आरोह म्हणजे वर जाण्याची क्रिया.
(आ) अल्पायुषी x दीर्घायुषी
अल्पायुषी म्हणजे कमी आयुष्य असणारा/असणारी व दीर्घायुषी म्हणजे जास्त आयुष्य असणारा/असणारी.
(इ) सजातीय x विजातीय
सजातीय म्हणजे एकाच जातीचे व विजातीय म्हणजे विभिन्न जातीचे.
(ई) दुमत x एकमत
दुमत म्हणजे वेगवेगळे मत व एकमत म्हणजे एकच मत.
उ) नापीक x सुपीक
नापीक म्हणजे जिथे काहीही पिकात नाही अशी जमीन व सुपीक म्हणजे चांगले धान्य होते अशी जमीन.