विद्याथ्र्यांनी सुट्टीमध्ये केलेल्या कलाकुसरीच्या विविध वस्तुंची पदशन
Answers
Answer:
विद्यार्थ्यांना सुटी, शिक्षक मात्र शाळेतच
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
करोनाचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाच्या आदेशानुसार शाळांना सुटी असली तरी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मात्र, शाळेतच दिसून आले. शालेय प्रशासनांकडून शिक्षक, शिक्षकेतरांना सुटीबाबत सूचना देण्यात आलेल्या नसल्याने शाळेत यावे लागल्याच्या प्रतिक्रिया शिक्षकांनी दिल्या.
करोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात थैमान घातले आहे. राज्यातही या विषाणूची लागण झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे वेळीच दक्षता घेण्याच्या दृष्टीने ३१ मार्चपर्यंत विविध संस्था, शाळा, कॉलेजेस बंद करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यानुसार नाशिकमधील शाळाही ३१ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. शहरातील अनेक शाळा प्रशासनांनी याविषयी माहिती देण्यासाठी शाळेच्या दर्शनीय भागात फलक लावून तसेच एसएमएसद्वारे पालकांना याबाबत माहिती दिली. मात्र, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना याबाबत कोणतीही अधिकृत सूचना न दिल्याने सोमवारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शाळांमध्ये उपस्थित होते. विद्यार्थी नसल्याने अध्यापनाचे काम नसल्याने या वेळेत ज्या शिक्षकांकडे बोर्डाच्या पेपर तपासणीचे काम देण्यात आले आहे, ते पूर्ण करण्यात शिक्षक व्यग्र दिसून आले.
--
आजपासून सुटीची शक्यता
शिक्षकांना करोनाची लागण होऊ शकत नाही का, अशा आशयाच्या पोस्ट शिक्षकांकडून सोमवारी व्हायरल केल्या जात होत्या. तसेच शिक्षण आयुक्तांनी शिक्षकांनाही सुट्टी असल्याबाबत दिलेली प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात शेअर केली जात होती. त्यामुळे आज (दि. १७)पासून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही सुटीवर असण्याची शक्यता आहे.
--
सुटीपूर्वी मार्गदर्शन
या पंधरा दिवसांच्या सुटीपूर्वी विद्यार्थ्यांमध्ये शाळांकडून करोनाविषयी जागरुकता निर्माण करण्यात आली असून, विद्यार्थ्यांना स्वच्छ हात धुण्याच्या, गरज असल्यास मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पंधरा दिवसांच्या सुटीत विद्यार्थ्यांनी त्यांची योग्य काळजी घ्यावी, हा त्यामागील उद्देश होता, असे शाळांच्या वतीने सांगण्यात आले