विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा: लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात.
Answers
लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात. हे विधान अयोग्य आहे.
समघनी नकाशाचे लोकसंख्येचे वितरण दाखविण्याशी काही संबंध नाही. समघनी नकाशा हे लोकसंख्येचे वितरण दाखवीत नाही तर चलाचे सलग वितरण दाखवीत असते. उदा. एखाद्या प्रदेशातील उंची काय, तापमान काय, पर्ज्यन्यची स्थिती काय हे समजून घ्यायचे असेल तर समघनी नकाशाद्वारे माहिती घेतली जाते. चलांचे सलग वितरण जाणून घेण्यासाठी समघनी नकाशा कसे समजतात हे जाणून घेणे आवश्यक असते. पण समघनी नकाशांचे लोकसंख्येचे वितरण दाखविण्यासाठी उपयोग होत नाही हे निश्चित आहे.
★ उत्तर - लोकसंख्येचे वितरण दाखवण्यासाठी समघनी नकाशा वापरतात.
हे विधान अयोग्य आहेत.
लोकसंख्येचे वितरण दाखविण्यासाठी टिंब पद्धतीचा नकाशा वापरतात. दिलेल्या भौगोलिक घटकांच्या आकडेवारीनुसार एका टिंबाची किंमत ठरवावी लागते. दिलेल्या आकडेवारीनुसार ज्या प्रदेशांना संख्यात्मक किंमत कमी असते तेथे टिंबाची संख्या कमी असते. त्यामुळे लोकसंख्येचे वितरण कोणत्या प्रदेशात जास्त आहे. आणि कोणत्या प्रदेशात कमी आहे. हे नकाशावरून सहज ज्ञान होते.
धन्यवाद...