विधान योग्य की अयोग्य ते सकारण लिहा: क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात.
Answers
Answered by
32
क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात. हे विधान अयोग्य आहे.
क्षेत्रघनी नकाशांचे उद्देश प्रदेशाची किंवा क्षेत्राची उंची दाखवणे हे नसून भौगोलिक घटकांची आकडेवारी आणि माहिती वेगवेगळ्या छायाछटांनी दाखविणे हा असतो. ह्या मध्ये घटकांचे मापन, त्यांचे सर्वेक्षण, इत्यादी करून प्राप्त झालेल्या माहितीनुसार योग्य आणि अचूक क्षेत्रातील माहिती काढली जाते. एखाद्या क्षेत्राच्या लोकसंख्येची घनता किती, ती घटकानुसार वाढते कि कमी होते हे दाखवायचे झाले तर आपण क्षेत्रघनी नकाशाचे आधार घेत असतो. म्हणून क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात. असे समजणे अयोग्य आहे.
Answered by
13
★ उत्तर - क्षेत्रघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात.
हे विधान अयोग्य आहे.
क्षेत्रघनी नकाशा लोकसंख्येची घनता दाखवण्यासाठी वापरतात. तर समघनी नकाशा उंची दाखवण्यासाठी वापरतात. समघनी नकाशात उंची दाखवण्यासाठी सममूल्ये नकाशांचा वापर केला जातो. तर क्षेत्रघनी नकाशात प्रदेशातील उपविभागांच्या घटकातील कमीत कमी व जास्तीत जास्त मूल्ये विचारात घेतात. त्यानंतर त्याचे साधारणतः ५-७ गटांत वर्गीकरण करतात. प्रत्येक गटानुसार एकाच रंगछटा किंवा कृष्णधवल आकृतिबंध वापरले जातात. ते वापरताना वाढत्या मूल्यांप्रमाणे गडद होत जातात व ते मूल्यगटानुसार नकाशावर काढले जातात.
धन्यवाद...

Similar questions