Economy, asked by nitingaikwad5007, 5 months ago

वतूची मागणी ही वस्तू च्या
------- वर अवलंबून असते.​

Answers

Answered by Sajolkumar202182
3

Answer:

mere se kohi pyar kroooo

Answered by shamaedu786
0

Explanation:

शोध पोर्टल

शिक्षण

विद्यार्थ्यासाठी दालन

अर्थशास्त्र

मागणी

अवस्था:

उघडा

मागणी

मागणीच्या नियमाला काही अपवाद

मागणीची लवचिकता

मागणीची लवचिकता कशावर अवलंबून असते

मागणीच्या लवचिकतेचे महत्व

मागणीची उत्पन्न-लवचिकता

संयुक्त मागणी

परप्रवृत्त मागणी

मागणी : विशिष्ट काळात, विशिष्ट किंमतीला वस्तूचे विशिष्ट परिमाण मागितले जाणे. उपभोक्त्याला आपल्या अनेकविध गरजा भागविण्यासाठी उपभोग्य वस्तूंची आवश्यकता भासते. म्हणूनच उपभोक्ता किंवा ग्राहक आपल्याजवळ असलेल्या क्रयशक्तीचा उपयोग करून उपभोग्य वस्तू खरेदी करतो; म्हणजे उपभोक्ता त्या त्या वस्तूंची मागणी करतो. म्हणूनच एखादा ग्राहक दुधाची मागणी करतो, म्हणजे दर लिटरला विशिष्ट भावाने ग्राहक विशिष्ट परिमाण दूध खरेदी करण्यास तयार आहे, असा अर्थ अभिप्रेत होतो. अशा रीतीने ‘मागणी’ या शब्दात वस्तूचे परिमाण आणि ते विकत घेण्यासाठी किंमत देण्याची तयारी म्हणजेच क्रयशक्तीचे अस्तित्व, या दोहोंचाही अंतर्भाव होतो.

अत्यल्प काळात किंवा एखाद्या क्षणी उपभोक्ता एखादी वस्तू निरनिराळ्या किंमतींना निरनिराळ्या परिमाणांत खरेदी करण्याची तयारी दर्शवील. उपभोक्त्याने किंवा ग्राहकाने निरनिराळ्या किंमतींस मागणी केलेल्या एखाद्या वस्तूच्या परिमाणांच्या कोष्टकाला व्यक्तीचे ‘मागणी कोष्टक ’ असे म्हणतात. या कोष्टकात एका बाजूला वस्तूची प्रत्येक नगास किंमत व दुसऱ्या बाजूस वस्तूचे मागणी-परिमाण ही दिलेली असतात. व्यक्तीचे मागणी-कोष्टक खाली दिल्याप्रमाणे असते :

ग्राहक वेगवेगळ्या किंमतीस एखादी वस्तू वेगवेगळ्या परिमाणांत कशी घेईल, हे मागणीच्या कोष्टकावरून दिसून येते. जसजशी वस्तूची किंमत कमी होत जाते, तसतसे मागणीचे परिमाण वाढत जाते. दुधाची किंमत लिटरला दोन रुपये असेल, तर ग्राहक तीन लिटर दुधाची मागणी करील. दुधाची किंमत लिटरला दीड रुपया असेल, तर मागणी चार लिटर असेल. याचा अर्थ असा नव्हे की, दुधाची किंमत उतरत राहील आणि ग्राहक दूध खरेदी करीत राहील. समजा, ग्राहकाने दोन रुपये लिटर या भावाने तीन लिटर दूध घेतले आणि पुढच्या क्षणी दुधाचा भाव दीड रुपया लिटर झाला, म्हणजे परत तोच ग्राहक चार लिटर दूध घेणार नाही; कारण दूध घेण्यासाठी त्याने राखून ठेवलेले पैसे आधीच खर्च झाले आहेत. सारांश, एका विशिष्ठ क्षणी किंवा अत्यल्प काळात ग्राहक एका विशिष्ट किंमतीला एकच वस्तुपरिमाण घेऊ शकतो. म्हणून मागणी-कोष्टकात एकच किंमत आणि एकच वस्तु-परिमाण सत्य असतात, बाकीच्या किंमती आणि परिमाणे कोष्टक तयार करण्यासाठी मानलेली असतात. एका व्यक्तीच्या मागणी-कोष्टकाप्रमाणे अनेक व्यक्तींची मागणी-कोष्टके तयार करता येतील. सर्व व्यक्तींच्या मागणी-कोष्टकांच्या साहाय्याने, वेगवेगळ्या विशिष्ट किंमतींनुसार बाजाराची एकंदर मागणी-परिमाणे नमूद करून वस्तूचे बाजारी मागणीचे कोष्टक बनविता येईल. समजा, दुधाचे बाजारी मागणीचे कोष्टक खालीलप्रमाणे आहे :

Similar questions