Hindi, asked by shahreenbano7428, 9 months ago

very creative nibandh on mazi shala in marathi

Answers

Answered by dindayal70
1

Answer:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठी निबंध | Dr Babasaheb Ambedkar Essay in Marathi

बाबासाहेब, आता तुम्ही हवे होता ! बघा ना, तुमच्या मुलांनी काय काय मिळवले आहे. कुणी एखादया राज्याचा मुख्यमंत्री झाला आहे, तर कुणी विदयापीठाचा कुलगुरू, कुणी देशाचा उपराष्ट्रपती, तर कुणी प्रत्यक्ष राष्ट्रपती. बाबासाहेब हेच तुम्हांला हवे होते ना !

तुम्ही ज्यांच्यासाठी आयुष्यभर खपलात त्याच तुमच्या अनुयायांनी खूप प्रगती केली आहे. त्यांनी शिकावे. अज्ञानरूपी अंधकारातून बाहेर पडावे, म्हणून तुम्ही धडपडलात, शाळा काढल्यात, महाविदयालये काढलीत. 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' ही संस्था काढली. त्याला आज सुमधुर फळे आली आहेत. बाबासाहेब, हे पाहायला तुम्ही हवे होता !

बाबासाहेब, तुम्ही नेहमी आम्हांला सांगत होता की 'वाचाल तर वाचाल'. त्याचा पुरेपूर प्रत्यय आज आला आहे. तुमच्या सांगण्यानुसार जे वाचायला शिकले त्यांनी खूप वाचले आणि मग त्यांनी स्वतः लिहायला सुरुवात केली. समाजाकडून वर्षानुवर्षे, पिढ्यान्पिढ्या ज्यांचे दमन झाले होते. त्यांनी धडपड करून आपली प्रगती साधली. त्यामागे तुमचीच प्रेरणा होती. मग या मंडळींनी आपल्या सुखदुःखाचे अनुभव शब्दांत मांडले.

जीवनाची कठीण वाट तडवताना' बसलेल्या ठेचा त्यांनी आपल्या लेखनातून मांडल्या. अशा या आगळ्यावेगळ्या पण वास्तववादी साहित्याने आज मराठी सारस्वताचे भांडार समृद्ध झाले आहे. आज सर्व मराठी भाषिकांनी त्या साहित्याला गौरवले आहे. कित्येकांच्या पुस्तकांची इतर भाषांतही भाषांतरे झाली आहेत. डॉ. नरेंद्र जाधव यांच्या ' आमचा बाप आणि आम्ही ' या पुस्तकाने तर स्वदेशाच्या मर्यादाही ओलांडल्या आहेत. जगातल्या अनेक भाषांत या पुस्तकांचे भाषांतर झाले आहे. बाबासाहेब, तुमच्या या लेकरांनी केलेली ही प्रगती पाहायला आज तुम्ही हवे होता !

हे झाले दलित समाजाबददल. परंत बाबासाहेब तम्ही फक्त दलितांसाठीच कार्य केले. असे नाही. तुमच्या डोळ्यासमोर फक्त दलित समाज नव्हता; तर अखंड समर्थ भारत होता. या देशातील प्रत्येकाला उन्नत आयुष्य मिळावे, असा तुमचा ध्यास होता. त्यासाठी जगात कोणत्याही देशाला लाभली नाही, अशी अजोड घटना तुम्ही लिहिलीत. या देशाला तुम्ही मार्ग दाखवलात.

त्याच मार्गाने जात असल्यामळे आज आपला देश देदीप्यमान अशी प्रगती करीत आहे; जगातील महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे. आपल्या अवतीभवतीचे पाकिस्तान, बांगलादेश व अन्य शेकडो देश दुःखदैन्याच्या कर्दमात रुतले आहेत. तुमच्यासारखी विशाल दृष्टी व अंतःकरण असलेला घटनाकार त्यांना लाभला नाही. आम्ही भारतमातेचे पुत्र किती भाग्यवान की, तुमच्यासारखा महामानव आम्हांला नेता म्हणून लाभला !

खरे तर, तुम्ही फक्त दलितांचे, फक्त भारतीयांचेच नव्हे, तर अखिल मानवजातीचे उद्धारकर्ते आहात ! तुम्ही दाखवलेल्या मार्गाने जाऊन आम्ही भारतीय आज जगभर कशी पताका फडकवत आहोत, हे पाहायला तुम्ही हवे होता ! एक खरे की, भारतात अजूनही दीनदलित, शेतमजूर, कष्टकरी, भूमिहीन दारिद्र्यात होरपळत आहेत. आज आपला देश त्यांच्याही उन्नतीसाठी प्रयत्न करीत आहे. परंतु तुम्ही असता, तर हे प्रयत्न अधिक वेगाने झाले असते. आपल्या समाजातील दुबळी अंगे अधिक वेगाने बलशाली करता आली असती.

आम्ही या क्षणी तुम्हांला ग्वाही देतो की, तुमची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही दाखवलेल्या मार्गाने आम्ही निष्ठेने प्रयत्न करीत राह आणि या देशात मानवतेचे साम्राज्य निर्माण करू !

Similar questions