India Languages, asked by sameeraa2494, 1 year ago

What are the benefits of bhabul bee in marathi?

Answers

Answered by annuharvanvi
0
Hey dear....

Here is your answer.....

Benefit of babhul bee......

In your language Marathi....... Aapni Basha mee feel Hii......

बाभळीत टॅनिन नावाचे द्रव्य असते ज्याने रोग प्रतिबंधक औषधे तयार करता येतात. बाभळीचे लाकूड मुबलक मिळत असल्याने ते स्वस्त असते; म्हणून फर्निचर, इमारतीचे बांधकाम, हत्यारं (टूल्स) यांचे दांडे आणि बोटीचे लंबर बनवण्यास त्याचा उपयोग होतो.
दुसरा आणि महत्त्वाचा उपयोग म्हणजे बाभळीवर येणार गोंड किंवा डिंक. झाडातून निघणारा पिवळटसार रंगाचा द्राव वाळला कि त्याचे अंड्यासारखे पिवळसर डिंक तयार होते.
ते पाण्यात विरघळणारे असते. डिंकामध्ये ५२ टक्के कॅल्शियम आणि २० टक्के मॅग्नेशियम असते.भारतीय बाभळीचा डिंक औषध तसेच चिकटवण्यासाठी वापरतात. तसेच थंडीमध्ये बदामाबरोबर खाण्यासाठी म्हणून सुद्धा उपयोग होतो.
तसेच तुपात टाळून खाल्ल्याने पण शक्ती मिळते. औषधी डिंक रक्तस्राव बंद करण्यासाठी पोटात घेण्याच्या औषधांमध्ये उपयोगात आणतात. त्यामुळे रक्त अतिसार व मासिक पाळी याच्यावर उपाय होतो.
बाभळीचे इतर अंग जसे फुले, फळे, फांद्या इत्यादी सर्व प्रकार दात स्वच्छ करण्यासाठी व हिरड्यांसाठी वापरतात. म्हणून बाभळी ही टाकाऊ नसून टिकाऊ आहे. टूथपेस्ट मध्ये पण बाभळीचा उपयोग केला जातो. असा हा बाभळीचा वृक्ष काटेरी, पण प्रेमळ.

Hope it helps you!!!!!
Attachments:
Similar questions