Why did the moderate congress put forward economic demands while it was a political organization
Answers
Answer:
नमस्कार मित्रांनो, मी सखू भाजीवाली बोलतेय. तुम्ही सर्व जण जेव्हा आपल्या आईबाबांबरोबर शनिवारच्या आठवडी बाजारासाठी या भाजी मार्केट मध्ये येता तेव्हा मला बघितलंच असेल. कारण हिरव्या गार आणि ताज्या पालेभाज्या फक्त माझ्याकडेच घेण्यासाठी लोक आवर्जून येतात. आजपर्यंत तुम्ही मला फक्त भाजीवली म्हणून ओळखत होतात पर्यंतु आज मी तुम्हाला माझे मनोगत सांगणार आहे.
मी भाजीवली बोलतेय. हो, इथे सर्वच जण मला भाजीवली म्हणून हाक मारतात, काही जण 'ओ भाजीवाल्या मावशी' तर काही जण मला 'ओ भाजीवल्या ताई' अश्या नावाने हाक मारून माझ्याकडे संवाद साधतात. पण माझे खरे नाव सखू आहे.
मला सखू भाजीवाली म्हणून पण माझ्या आसपासच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांमध्ये ओळखले जाते. हिरव्या पालेभाज्या या भाजी मार्केटमध्ये आणून विकणे व त्या मिळालेल्या मोबदल्यातून आपल्या घरच्या खर्चाला हातभार लावणे हे माझे काम आहे.
माझ्या घरी माझे पती आणि माझी दोन मुले आहेत. माझे पती एका किराणा दुकानात कामाला आहेत व माझी मुले शाळेत जातात. माझ्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि माझ्या घरचा खर्च ह्याची तजवीज करण्यासाठी मी आणि माझे पती आम्ही दिवसभर मेहनत करतो.
मी सकाळी लवकर उठून घरातील कामे उरकून पालेभाज्याच्या मोठ्या मार्केटमधून भाज्या विकण्यासाठी घेऊन या तुमच्या परिसरातील भाजीमार्केट मध्ये आणते. माझ्याकडे पालक, लाल माठ, शेपू, चवळी, मेथी, पुदिना, कोथिंबीर अश्या निरनिराळ्या हिरव्यागार ताज्या भाज्या असतात.
दिवसभर मी जेवढे होऊ शकेल तेवढे हया भाज्या गिऱ्हाईकांना विकण्याचा प्रयत्न करते. माझ्या बोलक्या स्वभावामुळे व माझ्याकडील ताज्या भाजीमुळे लोक आवर्जून पुन्हा पुन्हा येऊन माझ्याकडील भाज्या विकत घेऊन जातात हे पाहून मला खूप आनंद होतो. कारण माझ्याकडील भाजीची विक्री जेवढी जास्त होईल तेवढेच माझ्या कुटुंबाला ही आर्थिकदृष्टया मी थोडाबहुत हातभार लावू शकेन असे मला नेहमी वाटते.
माझी दोन्ही मुले खूप मेहनती व हुशार आहेत व त्यामुळेच घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मी पूर्ण प्रयत्न करते. मी स्वतः फक्त चौथी शिकलेली आहे परंतु मला माझ्या मुलांना मात्र खूप शिकवायचे आहे त्यासाठी वाटेल तितके कष्ट करण्याची माझी तयारी आहे.