India Languages, asked by srikanth3027, 1 year ago

write a letter to BMC for cleaning the garbage in Marathi​

Answers

Answered by fistshelter
58

Answer: अबक

१०४, चंद्रोदय कॉलनी

मुंबई-१२३४५६.

५ जुलै, २०१९.

प्रति,

महापौर,

मुंबई महानगरपालिका.

विषय- परिसरातील कच-याची दखल घेण्याबाबत.

महोदय,

मी, माझ्या परिसरातील रहिवाशांच्या वतीने आपणांस हे पत्र लिहित आहे. आमच्या परिसरात गेल्या आठवड्यापासून संबंधित कामगारांनी कचरा नेला नसल्यामुळे प्रचंड अस्वच्छता पसरली आहे. यामुळे रहिवासी वारंवार आजारी पडत आहेत.

संबंधित अधिका-यांना तक्रार करून सुद्धा समस्या दूर झालेली नाही. त्यामुळे तुम्ही तातडीने या प्रकरणात लक्ष द्यावे ही विनंती. आमच्या समस्या वेळेवर दूर झाल्या नाहीत तर आम्हाला नाइलाजाने कठोर पाऊल उचलावे लागेल.

तसदीबद्दल क्षमस्व.

आपला विश्वासू,

अबक

Explanation:

Similar questions