Write about shankarpali recipe in marathi?
Answers
साहित्य:
१/४ कप दूध
१/४ कप तूप
१/४ कप साखर
साधारण दिड कप मैदा
कृती:
१) दूध आणि साखर एकत्र करून साखर वितळेपर्यंत गॅसवर गरम करावे. (महत्त्वाची टिप खाली नक्की वाचा) हे मिश्रण कोमट करून घ्यावे.
२) या मिश्रणात तूप गरम करून त्याचे मोहन मैद्यामध्ये घालावे. मिक्स करून कोमट दुध घालून मैदा भिजवावा. भिजवलेला मैदा एकदम घट्ट किंवा एकदम सैल मळू नये. मध्यमसर मळावे. मळलेले पिठ २० मिनीटे झाकून ठेवावे.
३) २० मिनीटांनंतर पिठ परत एकदा मळून घ्यावे. २ इंचाचा एक गोळा करून थोडा मैदा भुरभुरवून लाटावे. कातणाने त्याचे शंकरपाळे पाडावेत. आणि तूपात किंवा तेलात सोनेरी रंगावर तळून काढावेत.
टीपा:
१) दुध आणि तूप एकत्र केल्यास काहीवेळा फाटते. म्हणून साखर आणि दुध गरम करून कोमट करावे. तूप निराळे गरम करून त्याचे मोहन मैद्यामध्ये घालावे.
२) अमेरिकेत दुध, तूप आणि साखर एकत्र उकळवून मी शंकरपाळे केले होते तेव्हा कधी दुध फाटले नव्हते. बहुदा ते प्रोसेस्ड असल्यामुळे असेल. पण भारतात दुध अन्प्रोसेस्ड असल्यास दुध आणि तूप एकत्र गरम केल्यावर ते काहीवेळा फाटू शकते.
२) दुधाऐवजी पाणी वापरले तरी चालेल. पाणी वापरल्यास पाणी, तूप आणि साखर एकत्र करून गरम करावे. साखर वितळली कि मिश्रण कोमट होवू द्यावे आणि मग मैद्यात घालून भिजवावे.