write about the information अणूचे वस्तुमान (Mass of Atom) in marathi
Answers
अणूचे वस्तुमान (Mass of Atom) अणूचे वस्तूमान त्याच्या केंद्रकात एकवटलेले असून ते त्यातील प्रोटॉन (p) वन्यूट्रॉन (n) मुळे असते. अणूकद्रकामा असणाऱ्या (p+n) च्या संख्येला अणुवस्तुमानांक (Atomic Mass Number) म्हणतात. प्रोटान व न्यूट्रॉन याना एकत्रितपणे अणुकेंद्रातील मूलकण (Nucleons) असे संबोधतात.
अणू हा अतिशय सूक्ष्म असतो. मग त्याचे वस्तुमान कसे ठरवायचे? हा प्रश्न शास्त्रज्ञांनाही पडला होता. 19 व्या शतकातील वैज्ञानिकांना अणुवस्तुमान अचूकपणे मोजणे शक्य नसल्याने 'अणूचे सापेक्ष वस्तुमान' ही संकल्पना पुढे आली. अणूचे सापेक्ष वस्तुमान मोजण्यासाठी एका संदर्भ अणूची गरज होती. हायड्रोजनचा अणू सर्वात हलका असल्याने सुरुवातीच्या काळात हायड्रोजनची निवड संदर्भ अणू म्हणून झाली. ज्याच्या केंद्रकात केवळ एक प्रोटॉन आहे अशा हायड्रोजन अणूचे सापेक्ष वस्तुमान एक (1) असे स्वीकारण्यात आले. त्यामुळे सापेक्ष अणुवस्तुमानाचे मूल्य हे अणुवस्तुमानांइतके (p+n) झाले.
हायड्रोजनचे सापेक्ष अणुवस्तुमान एक (1) मांडल्यावर नायट्रोजन अणूचे वस्तूमान किती हे कसे ठरवायचे? नायट्रोजनच्या एका अणूचे वस्तुमान हायड्रोजनच्या एका अणूच्या चौदा (14) पट असते म्हणून नायट्रोजन अणूचे सापेक्ष वस्तूमान हे 14 आहे. यानुसार विविध मूलद्रव्यांची सापेक्ष अणुवस्तुमाने ठरवली गेली आहेत. या मापनश्रेणीत अनेक मूलद्रव्यांची सापेक्ष अणुवस्तुमाने अपूर्णांकी आली. यामुळे काळाच्या ओघात वेगवेगळ्या अणूंची संदर्भ अणू म्हणून निवड झाली. शेवटी 1961 मध्ये कार्बन अणूची संदर्भ अणू म्हणून निवड झाली या पद्धतीत कार्बनच्या एका अणूचे सापेक्ष वस्तुमान 12 स्वीकारले गेले.
mla unfollow kar all I'd vrn........