योगा या विषयावर निबंध लिहा
Answers
Answered by
1
शारीरिक आणि मानसिक त्रासांपासून व विकारांपासून दूर राहण्यासाठी सर्वात सोपा व अत्यंत फायदेशीर उपाय म्हणजे योगा होय. आपल्या रोजच्या दैनंदिन धकाधकीच्या जीवनात नियमित योगा केल्याने शारीरिक व मानसिक आरोग्य वाढते. नियमित योगा केल्याने मानसिक ताण तणाव कमी होतो. वजन नियंत्रणात आणण्यासाठी, शरीरातील साखर नियंत्रणात आणण्यासाठी, रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी, वृद्धापकाळातील आरोग्य जपण्यासाठी योगा फार महत्त्वाचा आहे. तजेलदार त्वचा, शांत आणि प्रसन्न मन व उत्तम आरोग्य जपण्यासाठी सूर्यनमस्कार, कपालभारती, प्राणायाम या योगक्रियांनी वजनही कमी होते. योगामुळे दिवसभर शांत व प्रसन्न वाटते. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीर चपळ व लवचिक बनते. 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून पूर्ण जगभरात साजरा केल्या जातो.
Similar questions
Math,
7 months ago
Political Science,
7 months ago
India Languages,
1 year ago
India Languages,
1 year ago
Math,
1 year ago
Economy,
1 year ago