History, asked by siddhijagtap0000, 10 months ago

(ब) पुढीलपैकी
चुकीची जोडी
दुरुस्त करून पुन्हा
लिहा.
(१) रायगडाला जेव्हा जाग येते - वसंत कानेटकर
(२) टिळक आणि आगरकर - विश्राम बेडेकर
(३) साष्टांग नमस्कार - आचार्य अत्रे
(४) एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर​

Answers

Answered by karishma1514
1

Answer:

which language cant know sorry

Explanation:

ask in english plz

thanku

Answered by Sauron
6

Answer:

चुकीची जोडी :

४) एकच प्याला - अण्णासाहेब किर्लोस्कर

Explanation:

'एकच प्याला' याचे लेखक अण्णासाहेब किर्लोस्कर नसून राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज उर्फ बाळकराम) हे आहेत.

(१) रायगडाला जेव्हा जाग येते - वसंत कानेटकर

रायगडाला जेव्हा जाग येते याचे लेखक वसंत कानेकर आहेत.

'वेड्याचं घर उन्हात' हे त्यांचे पहिले नाटक होते. त्यानंतर 'रायगडाला जेव्हा जाग येते' ,'मत्स्य गंगा', 'अश्रूंची झाली फुले' इत्यादींचे लिखाण केले.

(२) टिळक आणि आगरकर - विश्राम बेडेकर

विश्राम बेडेकर उर्फ विश्वनाथ चिंतामणी बेडेकर यांनी 'टिळक आणि आगरकर' या व्यतिरिक्त 'ब्रह्मकुमारी' तसेच 'वाजे पाऊल आपुले' 'रणांगण' (कादंबरी) 'काबुलीवाला'

(हिंदी पटकथा) इत्यादींचे लिखाण केले.

(३) साष्टांग नमस्कार - आचार्य अत्रे

प्र. के. अत्रे (प्रल्हाद केशव अत्रे) यांनी 'साष्टांग नमस्कार' याव्यतिरिक्त अनेक नाटकांचे लेखन केले आहे त्यापैकी, तो 'मी नव्हेच' 'गुरू-दक्षिणा' 'भ्रमाचा भोपळा' 'मोरूची मावशी' इत्यादी.

(४) एकच प्याला अण्णासाहेब किर्लोस्कर (चुकीची जोडी)

कारण 'एकच प्याला' या नाटकाचे लेखक आहेत राम गणेश गडकरी दिलेल्या प्रश्नांमध्ये अण्णासाहेब किर्लोस्कर असे नाव आहेत एकदम चुकीचे आहे.

गोविंदाग्रज यांनी एकच प्याला व्यतिरिक्त 'गर्वनिर्माण' 'वेड्यांचा बाजार' 'राजसंन्यास' इत्यादी नाटकांचे लिखाण केले आहे

वरील स्पष्टीकरणावरुन असे दिसून येते की,

(४) एकच प्याला - अण्णासाहेब किर्लोस्कर चुकीची जोडी आहे.

Similar questions