ब्राझील आणि भारत या दोन देशातील लोकवस्तीची रचना, नागरी आणि ग्रामीण लोकवस्ती तसेच नागरीकरण यांबाबत एक परिच्छेद लिहा.
Answers
Answer: भारतात हवामानातील भिन्नता, पाण्याची उपलब्धता, जमिनीची सुपीकता आणि उतार यांमुळे लोकवस्त्यांच्या आकृतिबंधात विविधता आढळते.
उत्तर भारतीय मैदानी प्रदेश, पूर्व किनारपट्टी, नर्मदेचे खोरे, विंध्य पठार व शेतीखाली असणारे भारतातील इतर भाग या ठिकाणी केंद्रित वस्त्या आढळतात.
याउलट मध्यभारताचा वनाच्छादित भाग, राजस्थानचा पश्चिम व दक्षिण भाग, हिमालयाचा उतार व विखंडित तसेच उंचसखल प्रदेशात मानवी वस्त्या विरळ व विखुरलेल्या आढळतात.
ब्राझीलमध्ये सुरूवातीच्या वस्त्या युरोपमधून आलेल्या वसाहतवाद्यांनी निर्माण केल्या. या वस्त्या प्रामुख्याने ब्राझीलच्या किनारी प्रदेशात निर्माण झाल्या. आता या वस्त्या विकसित झाल्या असून त्या दाट घनतेच्या आहेत.
ब्राझीलचा ईशान्य भाग अवर्षणग्रस्त असून येथे ग्रामीण वस्त्या विरळ आणि विखुरलेल्या आहेत. किनाऱ्याकडून ब्राझीलच्या अंतर्गत भागात अमेझॉनच्या खोऱ्यात जाताना मानवी वस्त्या विरळ होत जातात.
Explanation: