भूकंपाची तीव्रता व घरांची पडझड यांचा कसा संबंध आहे?
Answers
जेव्हा भूकंप येतो त्यावेळेस जमिनीच्या हालचाली सुरू असतात. तसेच जमिनीला हादरे ही बसतात.पृष्ठभागावर ही याची लक्षणे दिसून येतात. याचा परिणाम जमिनीच्या पृष्ठभागावर असलेल्या घटकांवर ही होतो. जर भूकंपाची तीव्रता जास्त असेल तर घरांची पडझड होते.
अशाप्रकारे भूकंपाची तीव्रता व घरांची पडझड यांचा संबंध आहे.
Answer:
पृथ्वीचा अंतरंग हा कधीच स्थिर नसतो तिथे सतत हालचाली चालू असतात.
पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान खूप जास्त आहे आणि तिथे लाव्हा तापत असतो, त्यातून ऊर्जा बाहेर पडत असते.
या उर्जालहरी एका ठिकणाहून दुसऱ्या ठिकणी वाहत असताना भूगर्भात अस्थिरता निर्माण करतात, हि अस्थिरता कधी कधी इतक्या मोठ्या प्रमाणात असते कि तिथे होणाऱ्या हालचाली आपल्याला पृष्ठभागावर जाणवू लागतात. यालाच आपण भूकंप म्हणतो.
आपली घरे आणि इमारती या सपाट भूपृष्ठभागावर उभारलेल्या असतात, जेव्हा भूकंप येतो आणि कंपने जाणवू लागतात तेव्हा घरे आणि इमारती डगमगू लागतात.
जर हीच कंपने वाढली तर घरे आणि इमारती जमीनदोस्त होतात. काही ठिकाणी भूकंपामुळे जमिनीला भेगा पडतात, यात घरे यामध्ये गाडली जातात आणि जीवितहानी होऊ शकते.