भारतातील नैसर्गिक विविधतेमुळे पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे. (चूक की बरोबर ते सकारण सांगा)
Answers
Answered by
10
Answer:बरोबर.
Explanation:
भारत हा सांस्कृतिक तसेच नैसर्गिक वैविध्याने नटलेला देश आहे.
भारताच्या उत्तरेला हिमाच्छादित असा हिमालय आहे. पश्चिमेला वाळवंटी भाग आहे. तसेच पूर्व, दक्षिण आणि पश्चिमेला विस्तृत असा सागरकिनारा लाभला आहे. ईशान्येकडील निसर्ग सौंदर्य तर अप्रतिमच आहे. अशा त-हेने भारत हा जैवविविधतेने समृद्ध आहे. निसर्गाचा हा आविष्कार पाहण्यासाठी भारतात दरवर्षी हजारो पर्यटक येतात. त्यामुळे भारतात पर्यटन व्यवसायाचे भविष्य उज्ज्वल आहे.
Similar questions