can anyone tell me what is format of prasang lekhan in Marathi
Answers
Answer:
Prasang lekhan in Marathi प्रसंग लेखन मराठी नमुना
विद्यार्थी मित्रांनो आज आपण निबंधाचा पहिल्या प्रकाराचा परिचय करून घेऊ प्रसंग लेखन किंवा आलेला अनुभव कथनात्मक निबंध असे म्हटले जाते प्रसंग लेखन व अनुभव रचनात्मक निबंध म्हणजे एखाद्या प्रसंगाचे हुबेहूब वर्णन करणे किंवा एखादी स्वतः अनुभवलेली घटना स्वतःच्या शब्दात मांडणे म्हणजे प्रसंग लेखन किंवा अनुभव कथनात्मक निबंध होय
प्रसंग लेखन म्हणजे काय ?
प्रसंग लेखन म्हणजेच काय तर एखादी घटना पाहिलेले पदस्थळ एखाद्या दृश्याची व्यक्तीचे प्रसंगाची हुबेहूब शब्दात वर्णन करता काही मुद्दे लक्षात आले पाहिजे ते माहिती आहे की आपला निबंध उत्तम तयार होतो आणि तो तयार झाला की त्यात तुमच्या निरीक्षण शक्ती ची किमया लक्षात येते कारण जर तुमचे निरीक्षण म्हणजे बारीक नसेल तर त्या प्रसंगाचे वरण नीट होत नाही व लेखनात अनुभव महत्त्वाचा असतो म्हणून ह्याला अनुभव लेखन असेही म्हणले जाते यामध्ये आपण ज्या गोष्टी अनुभवलेल्या असत्या काही ऐकलेले असतात .
एखादी घटना प्रसंग एखादा विचार एखादी समस्या आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करीत असते कारण आता आपल्या मेंदूत प्रगल्भ झालेला आहे मग अशा मनातील विचारांना भावनांना योग्य पद्धतीने मांडले आवडतो प्रसंग व त्याच्या समोर दृश्यात त्याला जसाच्या तसा उभा राहावा असे लेखन करता आले पाहिजे म्हणजे आपल्या ज्या भावना आहे त्या आपल्याला प्रभावीपणे मांडता आल्या पाहिजे हे वापर करताना पाहिजे आणि हे सर्व जमले तर आपण उत्तम असे प्रसंग लेखन निघू शकतो .
प्रसंग लेख Prasang lekhan in Marathi प्रसंग लेखन मराठी न मराठी निबंध
प्रसंगलेखन करताना काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत :
1. योग्य प्रकारे शब्दबद्ध करा .
2. संवेदनशील लेखन असावे .
3. भाषेचा सहज ,
4 . योग्य वापर आपल्याला करता आला पाहिजे .
प्रसंग लेखन मराठी नमुना - prasang lekhan in marathi
आम्ही काढलेली वृक्षदिंडी प्रसंग लेखन मराठी निबंध
आज आपण सर्वत्र पर्यावरणाविषयी ऐकतो , वाचतो , पाहतो असे का ? तर पर्यावरण ही एक जागतिक समस्या झाली आहे . सर्वत्र प्रदूषण वाढलं आहे.हवा , पाणी , धूळ , आवाज , कचरा .. सगळीकडे प्रदूषण . या प्रदूषणाचे आपण कधी आणि कसे बळी होऊ हे सांगता येणार नाही . यासाठी आमच्या शाळेने प्रदूषण कसे रोखता येईल जनजागृती कशी करता येईल म्हणून वृक्षदिंडी चा कार्यक्रम ठरवला गेला .
या कार्यक्रमासाठी महिनाभर तयारी चालू होती.शाळेने प्रत्येक विद्यार्थ्याला एक छोटे रोपटे घरी लावायला सांगितले . ज्याला जे आवडेल आणि मिळेल असं रोपटे तयार करायचं होते . रोप कसं तयार करायचं यासंबंधी माहिती पण दिली . 2 ऑक्टोबर गांधी जयंती या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना तयार केलेली आपआपली रोपे घेऊन बरोबर सात वाजता शाळेत राहायला सांगितले .
सर्व विद्यार्थी गणवेशात आपली रोपे घेऊन हजर झाली . सर्व विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्साह आणि आनंद होता.त्या उत्साहात हातात रोपे घेऊन आमची मिरवणूक निघाली.मिरवणुकीत " झाडे लावा झाडे जगवा " , " झाडे लावा प्रदूषण रोखा " , " वृक्ष आपले मित्र " अशा घोषणा दिल्या जात होत्या .
आमच्या गावच्या मुख्य रस्त्यावरून ही आगळीवेगळी मिरवणूक निघाली . बघणारे लोकही उत्साहाने आणि कुतूहलाने मिरवणूक पहात होते . गावात फिरून दिंडी शाळेच्या पटांगणात आली . रोपे लावण्यासाठी खड्डे खणून पूर्वतयारी करण्यात आली होती . आळीसुद्धा तयार करण्यात आली होती . आम्हाला नेमून दिलेल्या ठिकाणी आमच्याकडून आमची रोपे लावण्यात आली आणि त्याला पाणी घालण्यात नंतर मुख्याध्यापकानीं वृक्षाचे महत्त्व सांगून आमचे खूप कौतुक केले . रोज आपापल्या रोपाला पाणी घालून वृक्ष जगवायला सांगितले . नुसते वृक्ष लावून उपयोग नाही तर त्यांना जगवण्याचा संदेशही त्यांनी दिला . नंतर आमच्या सरांनी तयार केलेले वृक्ष गीत झाले आणि कार्यक्रम संपला .
Prasang lekhan in Marathi प्रसंग लेखन मराठी नमुना
आपण आज या पोस्टमध्ये प्रसंग लेखन म्हणजे काय हे पाहिले आहेत आणि प्रसंग लेखनाचा नमुना म्हणजेच आम्ही काढलेली वृक्षदिंडी प्रसंग लेखन या विषयावर केले आहेत तरी तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रसंग लेखन किंवा इतर निबंध बातमी लेखन आणि तसेच मराठीमधील कोणतीही गोष्ट हवी असेल तर आम्हाला कमेंट मध्ये कळवा आम्ही लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येऊ आम्ही कमेंट वाचत आहोत
Explanation:
please mark me as Brainlist.