Computer Science, asked by vony638, 1 year ago

Essay on my elder sister in Marathi

Answers

Answered by simmujosan
2

Explanation:

आम्ही तिघे भावंडं ! पण दादा खूप मोठा आहे. आम्हा दोघीत फक्त दोन वर्षांचे अंतर आहे.म्हणून मी तिला ताई कधीच म्हणत नाही. दादाचे मुलगा म्हणून लाड होतात मी लहान म्हणून माझे लाड होतात पण ती मधलीच म्हणून तिचे कधीच लाड होत नव्हते पण ती अत्यंत हुशार असल्याने ती सर्वांच्या कौतुकास पात्र झाली. ती एकपाठी म्हणजे एकदा वाचल्यावर लक्षात ठेवणारी आहे. म्हणून सतत तिचा पहिला नंबर यायचा आणि मला शिक्षक ओरडायचे, “ तुझी बहीण बघ कशी हुशार आहे. तू पण पहिला नंबर काढ .” मी पण त्यासाठी जोराने अभ्यास करायचे आणि पहिला नंबर पटकवायचे. पण कधी कधी मी कमी पडले की ती माझी बाजू घ्यायची. मी कुठल्या शाखेचे शिक्षण घ्यायचे हे पण तिनेच ठरवले होते. म्हणून तिने माझी चांगल्या कॉलेजामध्ये ऍडमिशन घ्यायला लावली. ती सर्व कलांमध्ये पारंगत आहे, उदा. नाच, अभिनय, स्पोर्ट्स, वक्तृत्व इत्यादी. म्हणून मला पण ह्या सर्व गोष्टीत विद्यालयाने भाग घ्यायला लावला. खरे पाहता माझी सर्टिफिकेट फाईल हे तिच्याच परिश्रमाचे फळ आहे.

ती लहानपणापासून धाडशी आहे. ती कधीच भूताना घाबरत नाही. रस्त्याने कोणी छेड काढली तर

लगेच त्याची गचांडी धरते. लहानपणी ती मिलिटरी कॅम्पला पण जायची. म्हणून ती निडर बनली आहे. माझे शाळेत आणि रस्त्यावर ती रक्षण करते. मी तिच्यासारखे निडर व्हावयाचे ठरविते पण ती म्हणजे तीच! ह्या कारणाने सर्व तिला घाबरून असतात. पण ती मनाने खरोखरच मृदु आहे. “वज्रादपि कठोराणी मृदुनी कुसुमादपी” अशी आहे माझी बहीण!

सोनाली ताई अभिनयात वाकबगार आहेच, पण ती नकला पण खूप छान करते. एकदा एखाद्या व्यक्तीला पाहिले की लगेच ती त्यांच्या विशिष्ट खुब्या जाणून घेऊन बरोबर नक्कल करते. एकदा आमच्या आईच्या चकण्या मैत्रिणीची इतकी हुबेहूब नक्कल केली की बाबा पण पोट धरून हसले. माझी पण ती कधी कधी चेष्टा करते पण तिच्या चेष्टेचा राग येत नाही. ती कोणाच्याही व्यंगावर चेष्टा करीत नाही. ती म्हणते, “रूप आणि रंग हे देवाचे देणे आहे. आपले त्यात काहीच कर्तृत्व नसते.” म्हणूनच ती इतकी सुंदर असून देखील तिला गर्व नाही. उलट कोणी तिची आणि माझी तुलना केली तर ती त्यांच्यावर रागवते आणि सांगते ,”तिची बुद्धी बघा नं सौंदर्य आज आहे उद्या नाही, पण तिची बुद्धी कायम आहे.” आणि मला सांगते, “ बदके पिले सुरेख हे गाणे ऐकले नाही का? तू पण तशीच राजहंस आहे”.

सोनालीताई निर्णय घेण्यात अतिशय कुशल आहे एकदा आमची आई आजारी होती. तिला श्वास घेण्यास त्रास होत होता. घरी आम्ही दोघीच होतो. तिने पटकन आईला उचलले आणि शेजारीच असलेल्या डॉक्टर काकांकडे नेले .त्यांनी पटकन ऑक्सिजन लावला. आईला बरे वाटले आणि मग तिने बाबांना फोन केला. डॉक्टर काकांनी आणि बाबांनी तिचे कौतुक केले.

जरी ती माझ्यावर प्रेम करते तरी शिस्तीच्या बाबतीत ती कठोर आहे. तिला नीट नेटके रहायला आवडते. अस्ताव्यस्त कपडे तिला अजिबात चालत नाही. तसेच मी अगदी पूर्ण अवलंबून न राहावे म्हणून ती मला कठोरपणे सांगते, सारखे माझ्याबरोबर यायचे नाही. तुला तुझ्या मैत्रिणी असल्या पाहिजे. मग मी मैत्रिणी करायला लागले. माझ्या राहणे, खाणे, उच्चार सर्व बाबतीत ती काटेकोरपणे लक्ष देते. एकदा मला भाषण करायचे होते तेव्हा समोर बसून माझ्याकडून सराव करवून घेतला आणि समारंभात पण समोर बसून मला धीर दिला. त्यानंतर मला भाषण करताना कधीच भीती वाटली नाही.

आम्ही दोघी खूप गोष्टी शेयर करतो. आम्हाला न सांगता एकमेकी ना काय सांगायचे आहे ते समजते. एखादा जोक, एखाद्या माणसाची गम्मत करायची असल्यास आम्ही आमची सांकेतिक भाषा बोलतो आणि दोघीच हसतो. मग सर्व जण विचारतात “काय झाले” आम्ही सांगतो “ ती आमची गम्मत आहे” पण आता चिंता हीच आहे की तिचे लग्न झाल्यावर माझे कसे होईल ? पण ती म्हणते ,”चिंता नको, मी गावातलाच नवरा करीन. “

खरेच बहीण असणे किती भाग्याची गोष्ट आहे. आमचे हे प्रेम बघून माझ्या मैत्रिणी म्हणतात, आम्हाला पण एक बहीण हवी होती. पण छोट्या कुटुंबात आता एकच मुल असते. ते बहिणीसाठी तडफडतात .सोनाली ताई त्यांना म्हणते,” मी तुमची पण बहीण आहे. “ असे तिचे मोठे मन आहे. मला माझ्या बहिणीचा अभिमान वाटतो.

Answered by Hansika4871
0

*माझी मोठी बहीण*

*Essay on my elder sister*

छोट्या आणि सुखी कुटुंबात हम दो हमारे दो असं म्हटलं तर एका घरामध्ये एक भाऊ -बहीण किंवा बहीण -बहीण आणि आई-बाबा असे दिसून येतात. आमच्याही घरात आम्ही चौघे आहोत, माझे आई-बाबा, माझी मोठी बहीण आणि मी धाकटा.

माझ्या बहिणीचे नाव तनुजा आहे. माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी असलेली माझी बहीण लास्ट इयर ला आहे. आयपीसीसी एक्झाम दिल्यानंतर ती आता सी ए फायनल ची एक्झाम देण्यासाठी तयारी करत आहे. शैक्षणिक क्षेत्रातल्या उंचीबरोबर ताईने व्यक्तिमत्व विकास ही साधलेला आहे. आतापर्यंत तिला संस्कृत, जर्मन, फ्रेंच या भाषा अवगत असून कराटे क्लास मध्ये तिने नैपुण्य मिळवले आहे. त्याचबरोबर व्यक्तिमत्व विकासाचे म्हणजेच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चे धडे लोकांना देते ताईने स्वतःचा विकास साधलाच आहे. त्याचबरोबर माझ्याही व्यक्तिमत्व विकासाला तिचा हातभार लागलेला आहे. माझी तनुजा ताई प्रेमळ सुंदर असून सुस्वभावी आणि सर्वांशी प्रेमाने वागणारी आहे.

तिला उत्तम स्वयंपाक देखील बनवता येतो. अशी माझी मोठी ताई तनुजा मला खूप आवडते.

Similar questions