me paheleli chowpatty essay in marathi
Answers
Explanation:
गिरगाव चौपाटी (मराठी: चौघी चौपाटी, गिरगावा चौपाटी), मुंबई, भारताच्या गिरगाव भागात मरीन ड्राईव्हला लागून असलेल्या क्वीन्स नेकलेसच्या बाजूने एक सार्वजनिक समुद्रकिनारा आहे. हे चर्नी रोड रेल्वे स्टेशनद्वारे सर्व्ह केले जाते. समुद्रकिनारा गणेश विसर्जन सोहळ्यासाठी प्रख्यात आहे जेव्हा संपूर्ण मुंबई व पुणे येथून हजारो लोक अरबी समुद्रात गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी येतात. हे शहरातील अनेक ठिकाणी एक आहे जिथे दरवर्षी 'राम लीला' नाटक ऑन स्टेजवर सादर केले जाते. 10 दिवसाच्या कामगिरीच्या शेवटी वाळूवर उभारलेला रावण पुतळा जाळला जातो.
*मी पाहिलेली चौपाटी*
*Me pahileli chaupati essay*
दहावीच्या परीक्षा जवळ येत असल्याकारणाने आमचा अभ्यास जोर पकडत होता. पण रोज अभ्यास करून करून आम्हाला विरंगुळ्यासाठी कुठेतरी फिरायला जायची चटक लागली होती. एके संध्याकाळी मी आणि राजूने गिरगाव चौपाटी ला भेट देण्याचा निर्णय घेतला.
प्रवास करून आम्ही चरणी रोड स्थानकावर पोचलो, अवघे १५ मिनटे चाललो आणि आम्ही चौपाटी वर पोचलो.
मी तशी बर्याच वेळा चौपाटी ला भेट दिली होती, पण या वेळी ते दृश्य जरा वेगळेच होते. संध्याकाळचे सहा वाजले होते व सूर्य मावळण्याच्या अवस्थेत होता. आकाश नारंगी रंगाचे झाले होते, आणि पक्षी आपल्या घरी परतत होते. साडेसहा वाजता सूर्य मुंबईचा मोठ्याला बिल्डींग मागे मावळला. चौपाटीवर गर्दी वाढू लागली होती, लहान मुले वाळूमध्ये त्यांचे गड किल्ले बनवत होते. आम्ही देखील लहान होऊन त्या मुलांना मदत करायला गेलो व आमचा गड आम्ही बनवला. विविध प्रकारचे खेळणी विकणारे, फुगे फुगवणे करणारे तसेच कापसाचे गोळे बर्फाचे गोळे अशा विक्रेत्यांची गर्दी देखील होती. थोड्यावेळाने शतपावली केल्यानंतर आम्हाला भूक लागली व आम्ही चाट खायला गेलो. चौपाटीवर पंचवीस ते तीस प्रकारची चारची दुकान आहेत, पाणीपुरी शेवपुरी खाल्ल्यानंतर आम्ही फालुदा वर ताव मारला. बऱ्याच आठवणी आमच्या मनात साठवून आम्ही आमचा परतीचा प्रवास सुरु केला. दोघांपैकी कोणालाच घरी जावेसे वाटत नव्हते. एकूण ही संध्याकाळ खूप नयनरम्य होती.