Computer Science, asked by AsifKhan1375, 9 months ago

me shikshak mantri zalo tae essay in marathi language

Answers

Answered by YQGW
0

Explanation:

मी शिक्षणमंत्री झालो तर …

(प्रायमरीच्या विज्ञानाच्या पुस्तकात असे धडे येतील)

*युरेका युरेका*

तेव्हा पाहा असे झाले की, आपण सोन्याचा मुकुट बनविण्यासाठी सोनाराला दिलेल्या सोन्यापैकी काही सोने त्या सोनाराने चोरल्याची शंका ग्रीसच्या राजाला आली. तेणेकरून राजाने आपला दरबारी वैज्ञानिक आर्किमिडीज यांस या चोरीचा छडा लावण्याची आज्ञा केली.

आर्किमिडीजने मुकुटाचे वजन पाहिले तो ते राजाने दिलेल्या सोन्याइतकेच भरले. आर्किमिडीज चिंतेत पडला व रात्रंदिवस देवाचा धावा करू लागला. चौदा दिवस व चौदा रात्री अन्न व झोपेचा त्याग करून त्याने देवाची करूणा भाकली परंतु त्यास सोन्याच्या चोरीचे कोडे काही उलगडले नाही.

मग पाहा दिवसाच्या तिस-या प्रहरी तो अंघोळीस गेला असता, बाथटबमधे शिरताच त्यास परमेश्वराने स्पर्श केला व म्हटले तू ज्याचा विचार करीत आहेस त्या प्रश्नाचे उत्तर या बाथटबमधून बाहेर वाहत आहे. तरी त्यास बोध झाला नाही. परमेश्वर पुढे त्यास म्हणाला अरे अल्पविश्वासू मुला, पाण्यात बुडवलेली वस्तू आपल्या वस्तुमानाइतके पाणी विस्तापित करते हे साधं गणित तुला कळू नये काय ? हे ऐकताच त्याचे भान हरपले आणि तो तसाच विवस्र बाथरूममधून बाहेर येऊन मोठमोठ्याने ओरडू लागला “युरेका, युरेका !” म्हणजे मला सत्य सापडलं आहे, मला प्रभू सापडला आहे !

———————————————-

Answered by Hansika4871
0

*मी शिक्षक मंत्री झालो तर*

*Me shikshak mantri zhalo tar*

जर मला कोणी विचारलं की तुला काय बनायचं आहे ? तर मी लगेच बोलतो की मला शिक्षक मंत्री बनायला आवडेल. मी शिक्षक मंत्री झालो तर सर्वप्रथम सकाळी लवकर उठून, तयारी करून मला मंत्रालयात हजेरी लावायला जायला लागेल. गणित हा विषय माझा आवडीचा म्हणून मी मुलांनामध्ये गणिताची गोडी वाढवीन. ह्यासाठी मी विविध उपक्रम हाती घेऊन (गणित स्पर्धा इत्यादी) मुलांमध्ये गणिताची गोडी वाढविणे हे माझे मुख्य उद्दिष्ट असेल.

गरीब मुलांना शाळेतील शिक्षण फुकट अथवा कमी फीस मध्ये करून देईन, आणि जास्तीत जास्त मुलांना शिष्यवृत्ती मिळावी ह्या साठी प्रयत्न करीन. अभ्यासाचा मुलांवर भार पडू नये, ह्या साठी देखील मी काळजी घेईन आणि अभ्यासक्रम त्या हिशोबाने ठरवीन.

मुलांना चांगले संस्कार, श्लोक, पाठांतर, पाढे, वाचन ह्या गोष्टी वाढीस लावीन. मोठ्यांचा आदर करणे, त्यांना उलट उत्तर ना देणे, प्राणी पक्ष्यांविषयी दयाभाव असणे हे सगळं मी त्यांना शिकवीन. महान व्यक्तींच्या गोष्टी सांगून देशभक्तीपर अभिमान जागरूक करीन.

Similar questions