India Languages, asked by Bellesahrasah2325, 10 months ago

झाडे नसती तर मराठी निबंध, भाषण, लेख Zade Nasti Tar Marathi Essay

Answers

Answered by AadilAhluwalia
65

झाडे नसती तर

उन्हाळ्याचे दिवस होते. असंच एका झाडाखाली बसलो होतो. सहज मनात विचार आला, कि जर झाडे नसती तर.

झाडं निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. झाडं कसलीही अपेक्षा न करता आपल्याला नेहमी मदत करतात. झाडं नसली तर, कडकडत्या उन्हात आपल्याला सावली मिळणार नाही देतात. झाड फळ- फुलं देतात, ते सुद्धा मिळणार नाही.

झाडं घर बांधायला लाकूड देतात. लाकूड इंधन म्हणून सुद्धा वापरली जातात. श्वास घेण्यासाठी झाडं आपल्याला शुद्ध हवा देतात. जर झाडं नसली तर आपलं श्वास कसा घेणार?

नको बाबा!

झाडं आहेत तरच पृथ्वीवर जीवन आहे.

Answered by ItsShree44
11

Answer:                                                                                                         माणूस हा स्वत:ला बुद्धिमान प्राणी समजतो. सर्व प्राण्यांत श्रेष्ठ समजतो ! होय, हे  खरे आहे. माणूस सर्व प्राण्यांमध्ये बुद्धिमान आहे. त्याने बुद्धीच्या जोरावर प्रचंड प्रगती  केली आहे, यात शंका नाही. अनेकदा निसर्गाच्या नियमांना वाकवून स्वत:चा फायदा केला आहे, आपल्याला अनुकूल अशा गोष्टी केल्या आहेत. वेगवेगळ्या रोगांवर विजय मिळवला प्रलयाची ताकद असलेली अस्त्रे त्याने निर्माण केली आहेत. निसर्गाशी टक्कर देत देत तो इथवर आला आहे. त्यामुळे माणसाने निसर्गावर फार मोठा विजय मिळवला आहे, असेच तो टाकले आहे. यामुळे निसर्ग आपला राग अधूनमधून व्यक्त करतच असतो. बदललेल्या वातावरणात काही जीवजंतू नष्ट होतात. पण नवीन वातावरणात जगू शकणारे नवीन जीवजंतू निर्माण होतात. माणसाला हे आव्हान नवीन असल्यामुळे तो त्यांना तोंड देऊ शकत नाही आणि मग 'बर्ड फ्ल्यू', 'चिकन गुनिया' किंवा 'डोंबिवली फिव्हर' अशी नावे देऊन माणूस पण आहे. पंख नाहीत, पण अवकाशात भरारी मारत आहे. माणसाचे शरीर दुबळे आहे. मजत आहे. अनेक भाषणांतून, काव्यांतून याचे आपल्याला प्रत्यंतर येते. माणसाचा हा गर्व बघून निसर्गाला राग आला तर ? तो प्रचंड कोपला, तर काय होईल? माणूस निसर्गाच्या रागाला तोंड देऊ शकेल काय? निसर्गाशी लढाई करू शकेल काय ? समजा निसर्गाने ठरवले की, माणसाला सूर्याचे ऊन दयायचेच नाही, तर ? समजा निसर्गाने ठरवले, पाऊस पाडायचाच नाही, तर?

तसे पाहिले, तर या कल्पना करत बसण्याची गरजच नाही. माणूस प्रगतीच्या कितीही वल्गना करो, निसर्ग त्याला सदोदित आपली ताकद दाखवत असतोच. आठवून पाहा - काही वर्षांपूर्वी लातूरला भूकंप झाला, कच्छला भूकंप झाला. हजारो माणसे गाडली गेली. हजारो घरे जमीनदोस्त झाली. असंख्य माणसे कायमची अपंग बनली. रस्ते उखडले गेले. झाडे जमीनदोस्त झाली, रोगराई पसरली. निसर्ग कोपला, तर काय हेच होणार. हा निसर्गाचा कोप आहे. मोठमोठी धरणे बांधून विशिष्ट ठिकाणच्या जमिनीवरचा भार पराकोटीचा वाढला की समतोल नष्ट होतो. जमीन थरथरते. भूकंप होतो. हा निसर्गाचा संतापच आहे.

काही काळापूर्वी आलेली त्सुनामीची लाट ही निसर्ग कोपला तर काय करू शकते, याचे प्रत्यंतर जगाला आलेच आहे. शंभर शंभर फूट उंचीची उभ्या भिंतीसारखी पाण्याची ला प्रचंड वेगाने जमिनीवर येऊन आदळते, तेव्हा किनाऱ्यालगतची गावेच्या गावे वाहून जातात.माणसाने या संकटाला तोंड देणे सोडाच, पण दूर पळून जाणेही अशक्य बनते. भूकंप, त्सुनामी यांच्या पूर्वसूचना मिळवणे अदयापही माणसाला शक्य झालेले नाही. म्हणजे निसर्गापुढे माणूस क्षुद्रच आहे.

Similar questions