Social Sciences, asked by sushmamahale42, 6 months ago

कोणत्याही एका क्रांतिकारका विषयी माहिती​

Answers

Answered by selvamani11
0

Answer:

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

Jump to navigationJump to search

क्रांती करणाऱ्या व/किंवा अशा कार्यवाहीत भाग घेणाऱ्या व्यक्तींना क्रांतिकारक म्हणतात. इ.स. १८५७ चे भारतीय स्वातंत्र्ययुद्धात मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे,शेवटचा मुघल बादशाहा दुसरा बहादुरशहा जफर वगैरे स्वातंत्रवीरांचा सक्रिय सहभाग होता. मात्र स्वातंत्र्ययुद्ध अयशस्वी झाले, आणि भारतात ब्रिटिश सरकारचे शासन सुरू झाले. त्यापूर्वी आणि त्यानंतरही ज्या क्रांतिकारांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी हरप्रकारे प्रयत्‍न केले अशा काही क्रांतिकारकांची ही यादी :

अनंत लक्ष्मण कान्हेरे

उमाजी नाईक -- १८५७च्या कितीतरी आधीचा क्रांतिकारक

चंद्रशेखर आझाद

मंगल पांडे

दामोदर हरी चाफेकर

नाना पाटील

बाळकृष्ण हरी चाफेकर

भगतसिंग

मदनलाल धिंग्रा

राजगुरू

धर्मवीर लहूजी वस्ताद साळवे - १९५७च्या आधी, पेशवाईतील क्रांतिकारक.

वासुदेव बळवंत फडके - १८५७च्या सुमारास स्वतंत्रपणे लढणारा क्रांतिकारक

वासुदेव हरी चाफेकर

विष्णू गणेश पिंगळे

विनायक दामोदर सावरकर

भगतसिंग

राजगुरू

सुखदेव

सुभाषचंद्र बोस

सेनापती बापट

हेमू कलानी

बिरसा मुंडा

बेगम हजरत महल

कुंवरसिंह

राणी चेन्नमा

बहादूरशाह जफर

खुदीराम बोस

प्रितीलता वड्डेदार

बुधू भगत

शंभुधन फुंगलोसा

शंकर शहा

दर्यावसिंह ठाकूर

सुरेंद्र साए

चारुचंद्र बोस

रंगो बापूजी गुप्ते

गोमाजी रामा पाटील

हिराजी गोमाजी पाटील

झिपरु चांगो गवळी

आनंदीबाई झिपरु गवळी

नारायण नागो पाटील

दिनकर बाळु पाटील

गौतम पोशा भोईर

डाॅ. विश्राम रामजी घोले

यशवंतराव होळकर

राणी गाइदिनल्यू

राघोजी भांगरे 1818 ते 1845

डाॅ.सदाशिव खानखोजे

कोंडाजी नवले

रामजी किरवे

बिरसा मुंडा

खाज्या नाईक

झलकारी बाई

त्रंबक डेंगळे (पेशवाई)

जयनाथ सिंह

राजा नंदकुमार

राजा चेतसिंह

तिलाका मांझी

पझसी राजा -केरल वर्मा

मुधोजीराजे भोसले

घानासिंह

युवराज चैनसिंह

राणी चेन्नमा

तीरथसिंह

आत्माराम चौकेकर

फोंड सावंत

सुई मुंडा

चिमासाहेब भोसले

गंगानारायण

फकुन आणि बरुआ

चक्र बिष्णोई

शम्भूदान

राणी जिंदान कौर

मूलराज

सिदो कान्हू

मंगल पांडे

ईश्वरी पांडे

कुमारी मैना

अजिदुल्ला खाँ

मुहंमद अली

भीमाबाई

राणा बेनो माधोसिंह

फिरोजशहा

वाजिद अली शहा

बेगम हजरत महल

मौलवी अहमदुल्ला शहा

कुंवरसिंह

Explanation:

Answered by sejalpayalkaushal
0

Answer:

राजे उमाजी नाईक (जन्म: ७ सप्टेंबर १७९१ - मृत्यू: ३ फेब्रुवारी १८३२) हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील प्रथम आद्यक्रांतिकारक होते.

आद्यक्रांतीवीर नरवीर राजे उमाजी नाईक [खोमणे]

जन्म:

सप्टेंबर ७, १७९१

किल्ले पुरंदर,भिवडी, पुणे, ब्रिटिश भारत

मृत्यू:

फेब्रुवारी ३, १८३२

खडकमाळ आळी , पुणे, ब्रिटिश भारत

चळवळ:

भारतीय स्वातंत्र्यलढा

धर्म:

हिंदू (रामोशी)

वडील:

दादोजी खोमणे

आई:

लक्ष्मीबाई

भारताच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली, काहींची दखलच घेण्‍यात आली नाही. सन १८५७ च्या उठावाअगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो की पळो करून सोडणारे व सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारे महाराष्ट्रातील निधड्या छातीचे वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरले गेले.ते म्हणजे 'राजे उमाजी नाईक'.

३ फेब्रुवारीहा या आद्यक्रांतिकाराचा स्मृतिदिन. रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहत नाही. त्यामुळे, राजे उमाजी नाईक फक्त रामोशी-बेरड समाजापुरते सीमित राहून गेल्यासारखे होत आहे.पण सर्व जाती-धर्माँनी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

क्रांतिकारकांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जातिधर्मातील लोकांनी केले पाहिजे.मग हे राजे उमाजी नाईक असे उपेक्षित का राहून गेले हे आश्चर्य आहे.. 'मरावे परि क्रांतिरूपे उरावे' अशी उक्ती आहे ती आद्यक्रांतीकारक राजे उमाजी नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते. ते स्वतःच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीही स्वतःला रोखू शकले नाहीत. इंग्रज अधिकारी कॅप्टन रॉबर्टसन याने १८२० ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे, "उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार नाही?" तर मॉकिनटॉसम्हणतो, "उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता." हे केवळ गौरवोद्गार नसून हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कूटनीती आखली नसती तर कदाचित तेव्हाच भारताला स्वातंत्र्य लाभले असते.

°आद्यक्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक

उमाजीराजे नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लक्ष्मीबाई व दादोजी खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील किल्ले पुरंदर येथे झाला.वडिल दादोजी खोमणे पुरंदर किल्ल्याचे वतनदार होते.त्यामुळे उमाजीराजेंचे कुटुंब पुरंदर व वज्रगड किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत होते. त्यामुळेच त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. उमाजीराजे जन्मापासूनच हुशार, चंचल, शरीराने धडधाकट, उंचापुरे आणि करारी होते. त्यांनी पारंपरिक रामोशी हेर कला लवकरच आत्मसात केली. जसे उमाजीराजे मोठे होत गेले तसा त्यांनी वडील दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाला, कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण वगैरे चालवण्याची कला अवगत केली. या काळात इंग्रजांनी भारतात आपली सत्ता स्थापन करण्यास सुरुवात केली होती. हळूहळू मराठी मुलुख जिंकत त्यांनी पुणे ताब्यात घेतले. इ.स. १८०३मध्ये पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यास स्थानापन्न केले आणि त्याने इंग्रजांचा पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या वतनदारीचे व संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून

Similar questions