कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तूंची मागणी करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा
Answers
Answered by
199
औपचारिक पत्र - कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तूंची मागणी करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा
मनाली पाठक
पुणे.
१० मार्च २०२०.
प्रति,
अध्यक्ष,
जीवनदायी मंडळ,
सदाशिव पेठ, पुणे
विषय : कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तूंची मागणी
नमस्कार,
मी स्वतः आदिवासी, अनाथ आणि वृद्ध यासाठी काम करत असते. गेल्या आठवड्यात मी तुमच्या मंडळाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत मी उपस्थित होते. तिथे तुम्ही मातीच्या आणि बांबूच्या अनेक प्रकारच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले होते. सगळ्या सहभागी तरुणांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि अनेक प्रकारच्या वस्तू बनविल्या.
त्या वस्तू अनाथाश्रमात आणि वृद्धाश्रमात वाटण्याचा माझा मानस आहे. तरी त्या वस्तू तुम्ही मला वाजवी किमतीत उपलब्ध करून द्याल अशी आशा आहे.
आपली विश्वासू,
मनाली पाठक.
Answered by
0
कार्यशाळेत तयार झालेल्या वस्तूंची मागणी करणारे पत्र संबंधित मंडळाला लिहा
Similar questions
Social Sciences,
5 months ago
English,
5 months ago
Social Sciences,
5 months ago
Math,
10 months ago
India Languages,
10 months ago
Biology,
1 year ago