India Languages, asked by TbiaSamishta, 1 year ago

केरळ राज्यावर निबंध लिहा

Answers

Answered by Mandar17
0

केरळची सुंदर-सृष्टी प्रत्येक भारतीयाला नव्हे तर विदेशातील पर्यटकांना सुद्धा प्रेमात पाडते. भारतातील एक सुंदर राज्य म्हणजेच केरळ. केरळची राजधानी त्रिवेंद्रपूरम असून त्याचे क्षेत्रफळ  ३८८६३ चौरस किलोमीटर आहे.  येथील प्रमुख भाषा मलयाळम आहे. भारतामध्ये साक्षर राज्य म्हणून केरळला ओळखले जाते. सर्वदूर हिरवळ, नारळाचे लांबच लांब झाडे, पाणी व आयुर्वेद औषधी वनस्पतीमुळे केरळचे महत्त्व आहे. केरळचे केळीचे वेफर्स जगभर प्रसिद्ध आहे. केरळ हे राज्य "देवभूमी" म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच केरळ हा प्रदेश एक प्रमुख मसाला निर्यात म्हणून प्रसिद्ध राज्य  आहे. येथे चहाचे मळे सुद्धा आहेत. मिरची, नैसर्गिक रबर ,नारळ ,चहा,कॉफी आणि मसाले महत्त्वचे आहेत. केरळ हे भारतातील अग्रणीय पर्यटक स्थळ आहे . हिलस्टेशन ,किनारे, आयुर्वेदिक पर्यटन, बॅकवॉटर हे देखील केरळचे प्रमुख आकर्षण आहे.

Similar questions