English, asked by kopal320, 1 year ago

Kangaroo Information in Marathi | Mahiti, Short Essay |कांगारू

Answers

Answered by AadilAhluwalia
16

कांगारू एक सस्तन प्राणी आहे. हा प्राणी ऑस्ट्रेलिया मध्ये मोठ्या संख्येत आढळला जातो. हा प्राणी सर्व शिशुधानी प्राण्यांमध्ये सर्वात मोठा आहे. कांगारू लाल, करडा व नारंगी रंगात सापडला जातो. कांगारू ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे.

कांगारू सपाट प्रदेशात राहतात व नेहमी काळपट आढळून येतात. हे प्राणी शाकाहारी असतात आणि झाड पाला खाऊन त्यांचे पोट भारतात. त्यांची उंची ९०-२०० सेमी पर्यंत असते. कांगारूचे मागचे पाय खूप मजबूत असून ते लांब व उंच उडी मारण्याकरिता असतात. उडी मारण्यासाठी आधार म्हणून त्यांची शेपटी मध्ये खूप मांस असतो. तोल सावरण्याचा शेपटी कंगरुला मदत करते.

कांगारू आपल्या पिल्लाना थंडीच्या महिन्यात जन्म देतो. कांगारू ३०-४० दिवस गर्भावस्थेत असतो. जन्मानंतर पिल्लू ५ सेमी लांबीचे असते. मादी कांगारू उदरावर असल्या पिशवीती पिल्लाची वाढ होते. कंगरूच्या पिशवीत पिल्लाचे पालन पोषण होते आणि जेव्हा तो मोठा होतो, तेव्हा तोच पिशवीतून बाहेर येतो.

ऑस्ट्रेलिया मध्ये कंगरूचे मांस, हाडे कातडी खूप उपयोगी पडते . त्यांची संस्कृती कंगरुशी खूप जवलीकतेने जोडली गेली आहे. पुरातीन कथा कादंबर्यात कांगारू चा उल्लेख आहे. कांगारू एक मनमिळाऊ प्राणी आहे. त्याला माणूस व कुत्रा यांचाच धोका असतो. सरकारने कांगारू शिकारीवर कायद्याने बंदी घातली आहे.

Similar questions