English, asked by aneenabobanpara1811, 11 months ago

My Country Essay in Marathi, Maza Bharat Desh Nibandh, My India

Answers

Answered by AadilAhluwalia
4

जन गण मन' ऐकलं कि अचानक अंगात एक उस्फूर्त तरंग येते. आपल्या भारत देशाचा अभिमान झळकून येतो. माझा भारत देश खूप महान आहे. कारण विचारताय? माझा देशात जेवढी विविधता आहे, तितकी जगात कुठेच नाही.

भारत अनेक जाती, धर्म, वेष, भाषा, संस्कृती, परंपरा आणि वेगवेगळ्या चालीरीती पाळणारे लोक राहतात. इतकी विविधता असून प्रत्येक जण स्वतःला भारतीय म्हणवून घेण्यात अभिमान बाळगतो. 'विविधतेत एकता' हीच तर खासियत आहे भारताची. जगात सर्वात जुन्या संस्कृतीपैकी आपली संस्कृती आहे.

भारत देश आशिया खंडात येतो. भारत जगातला ७वा मोठा देश आहे. आणि लोकसंख्येचा बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर येतो. भारत २८ राज्य असून ९ केंद्रशासित प्रदेश आहेत. भारतात अनेक ऐतिहासिक स्मारके आहेत. जगातील ७ चमत्कारातील १ चमत्कार म्हणजेच ताज महाल भारतात आहे. तसेच लाल किला, इंडिया गेट, गेटवे ऑफ इंडिया, महाराष्ट्रातील किल्ले, कुटूंब मिनार, चार मिनार, शनिवार वाडा आणि अनेक स्मारके भारत आहेत. भारताचा इतिहास आणि स्वतंत्र चळवळ पूर्ण जगाला प्रेरणा देते.

माझा भारत भूमीवर महात्मा गांधी, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक, शिवाजी महाराज, स्वातंत्रवीर सावरकर असे अनेक महान व्यतिचा वास होता. ह्या भूमीने संतांची शिकवण घेतली आहे.

आम्ही भारतीय 'अथीती देवो भव' चा पालन करतो. मग कधी येतंय माझा देशाचं दर्शन करायला?

जय हिंद.

Similar questions