Marathi speech on happiness
Answers
Answer:
जेव्हा तुम्ही सज्ञान झालात, तेव्हापासून तुम्हाला एकाग्रचित्ताने काम करण्याची शिकवण दिली. पण वर्तमानात यावर विचार केला तर, ध्यानाचा अभाव आपल्याला नेहमी जाणवतो. साधारणपणे आपली दिनचर्या अशी असते की, आपण एखादे काम हातात घेतो आणि ते अर्धवट सोडून दुसऱ्या कामाला लागतो. जर एखादा महत्त्वाचा ईमेल येतो तेव्हा त्याचे उत्तर देत असतो किंवा सोशल मीडियावर मित्रांसोबत गप्पा मारण्यात रमून जातो किंवा फोनवर प्रश्नांची उत्तरे देत असतो. याचा परिणाम असा होतो की, दोन तासांनंतरही ते काम अपूर्ण राहते जे हातात घेतले होते.
सर्वसाधारण बोलीभाषेत याला म्हणतात मल्टीटास्किंग, जी वर्तमानाची गरज झाली आहे. पण कितीही गरज असली तरी हे तथ्य नाकारता येत नाही की, एकाचवेळी अनेक कामे केल्यामुळे संभ्रम निर्माण झाल्याने, चुका होतातच आणि त्या चुका सुधारण्यासाठी आपल्याला पुन्हा प्रयत्न करावा लागतो.
आधुनिक मनोविज्ञानाने याचा स्वीकार केला आहे की, दिर्घकाळापर्यंत विचलित ध्यानासह काम केल्याने मानसिक एकाग्रता पूर्णपणे नाहीशी होते. अशातच एक साधा सिद्धांतच कामी येतो. अर्थात एका वेळी जेव्हा आपण एखादे काम करत असता त्यावेळी त्याच कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करायला हवे. ते काम संपवून मगच दुसरे काम हातात घ्यावे त्यामुळे दोन्ही कामे व्यवस्थित पूर्ण होतील. एकाग्रतेच्या संबंधात धनुर्धर अर्जुनाची कथा सर्वांच्या मनात कोरली गेली आहे. अर्जुनाला आपल्या लक्ष्याव्यतिरिक्त दुसरे काहीही दिसत नव्हते.
जेव्हा मन एका कामात एकाग्र झालेले असते, त्यावेळी ध्यानाची तीव्रता अधिक वाढते. याचा परिणाम म्हणजे आपली कामे योग्य रितीने पूर्ण होतात. पाश्चिमात्य मनोवैज्ञानिकांनी याला डीप वर्क किंवा गहन कार्य असं नाव दिलं आहे. आजच्या काळात स्पर्धा एवढी वाढली आहे की,सखोल काम पूर्ण एकाग्रतेने काम करणे हा फक्त वेळेचाच सदुपयोग नाही तर वेळेचे नियोजनही आहे. आस्ताव्यस्त दिनचर्येत एखाद्या गोष्टीला फाटा असेल असेल तर मानसिक एकाग्रतेने पूर्ण केलेले काम हाच पर्याय आहे. जर आपण याला जीवनाचा धर्म म्हणून स्वीकार केला तर यानंतर आपली क्षमता पूर्णपणे विकसित होते.
उपनिषदांमध्ये दोन शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत- कर्म आणि धर्म. धर्माचा अर्थ आहे आपला स्वभाव आणि आपण जे काम करतो ते कर्म. कामात आपली दृष्टी बाहेर असते आणि धर्म आपल्या अंतर्मनाचा ठाव घ्यायला सांगतो. मनाबाबत आपल्याला हे माहिती आहे की, याला नियंत्रित करणे अत्यंत कठीण आहे, कारण मनात क्षणाक्षणाला तरंग उमटत असतात. याला मनाचा विकार झाला आहे असे म्हणतात आणि जेव्हा हे मन जेव्हा विचलन होण्याचे थांबते अशा शांत आणि निर्विकार दशेला आत्मा म्हणतात.
एकाग्रता हा असा बिंदू आहे ज्या ठिकाणी धर्म आणि कर्म एकरूप होतात आणि व्यक्ती स्वत:ला लक्ष्याच्या प्रति समर्पित करतो. यानंतर आपल्याला अर्जुनाप्रमाणेच पक्ष्याच्या डोळ्याव्यतिरिक्त अन्य काहीही दिसत नाही. मग कोणतेही लक्ष्य तुम्ही गाठू शकाल.
■आनंद(happiness) या विषयावर भाषण■
इथे उपस्थित सगळ्यांचा मी मनापासून स्वागत करतो.आज मी आनंद म्हणजेच हैपिनेस बद्दल बोलू इच्छितो.
आनंदाचा आपल्या प्रत्येकाच्या जीवनात महत्वपूर्ण स्थान असतो.याचा प्रभाव आपण आपले जीवन कसे जगू यावर होतो.जेव्हा तुम्ही आनंदी असता,तेव्हा तुम्ही तुमचे जीवन सुखाने जगू शकता.आपल्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यावर याचा चांगला परिणाम पडतो.
आपण आनंदी असल्यावर,आपले काम उत्साहाने करू शकतो,आपल्याला कामात यश मिळते,आपण इतरांनाही खुश करू शकतो.आनंदी असल्यावर आपले विचार सकारात्मक बनतात,आपण आजारांपासून दूर राहतो.
म्हणून,मित्रांनो 'आनंदी रहा आणि स्वस्थ बना'.
धन्यवाद!