सागरजलक्षारतेच्या भिन्नतेवर परिणाम करणारे घटक कोणते?
Answers
सागरजलातील क्षारतात आढळणारी भिन्नता अनेक कारकांवर आणि घटकावर अवलंबून असते. सागरजलातील क्षारतेतील भिन्नता पृथ्वीवरील वितरणातील असमानतेवर, सागरजलाला प्राप्त होत असलेल्या गोड्या पाण्याच्या पुरवठयावर अवलंबून असते. हे घटक सागरजलात क्षारता जास्त कि कमी हे ठरवतात आणि सागरजलाच्या क्षारतेच्या भिन्नतेवर परिणाम सुद्धा करतात. ज्या भागात तापमान अधिक त्या भागात क्षारतेचे प्रमाण अधिक तर कमी तापमानात क्षारता कमी आणि तापमान जास्त पण गोड्या पाण्याचा पुरवठा कमी तर क्षारतेचे प्रमाण निश्चितच वाढते.
★ उत्तर - सागरजलक्षारतेच्या भिन्नतेवर परिणाम करणारे घटक
सागरजलाची क्षारता सगळीकडे सारखी नसते. स्थानपरत्वे कमी जास्तपणा दिसून येतो. कारण सागरजलाच्या क्षारतेवर बाष्पीभवनाचा वेग, पर्जन्यमान, नादीनाल्यातून होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा, हिमजल यांचा परिणाम होतो. भुवेष्टित किंवा खंडांतर्गत समुद्राची क्षारता जास्त असते. कारण तेथील पाण्याचा , बाष्पीभवनाचा वेग जास्त असून गोड्या पाण्याचा स्रोतही मर्यादित स्वरूपाचा असतो.
धन्यवाद...