Hindi, asked by gangana, 8 months ago

संवाद लेखन
उदा:- 'इंटरनेट-एक मायाजाल' या विषयावर दोन व्यक्तीमधील संवाव लिहा
व्यक्ती-सौरभ व त्याचे बाबा
उत्तर-​

Answers

Answered by rajraaz85
8

Answer:

बाबा - अरे सौरभ तू काय करत आहे? सतत तुझ्या हातात मोबाईल असतो.

सौरभ - अहो मी मोबाईल वर व्हिडिओ बघत आहे.

बाबा - अरे सौरभ मोबाईल बघितल्यामुळे तुझे डोळे खराब होऊ शकता. इंटरनेट ही अशी गोष्ट आहे ज्यामुळे व्यक्ती सतत व्यस्त असते. कधीतरी बाहेर जाऊन मैदानी खेळ खेळावे.

सौरभ - आजकल सर्व मुले खेळ खेळण्यापेक्षा मोबाईल वरच वेळ घालवत असतात.

बाबा - अरे पण इंटरनेट एक मायाजाल आहे. जितका वेळ तुम्ही इंटरनेटवर असता तेवढा वेळ ते तुम्हाला गुंतवून ठेवते.

सौरभ - हो बाबा हे खरे आहे पण इंटरनेटमुळे आम्हाला नवीन नवीन गोष्टी शिकायला पण मिळतात.

बाबा - इंटरनेट हे गरजेपुरता वापरले पाहिजे. इंटरनेटचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे देखील आहे.

सौरभ - बाबा मी आजपासून ठरवले आहे. रोज बाहेर जाऊन मैदानी खेळ खेळायचे आणि गरजेपुरताच इंटरनेटचा वापर करायचा. धन्यवाद बाबा तुम्ही मला चांगल्या प्रकारे समजावून दिल्याबद्दल.

Similar questions