शाळेतील पाणी प्रदूषणविषय महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यास आज योग्य उपयोजन करण्याबाबत मागणी करणारे पत्र लिहा मराठी मध्ये लिहा
Answers
Answered by
9
पत्र लेखन
Explanation:
योगेश भाने,
शंकर विद्यालय,
टिळक रोड,
पुणे.
दिनांक: १७ नोव्हेंबर, २०२१
प्रति,
माननीय आरोग्य अधिकारी,
पुणे महानगरपालिका.
विषय: शाळेतील पाणी प्रदूषणाविषयी तक्रार पत्र.
महोदय,
मी, योगेश भाने,शंकर विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत आहे. या पत्राद्वारे मला तुमच्याकडे आमच्या शाळेतील पाणी प्रदूषणाविषयी तक्रार करायची आहे.
आमच्या शाळेत गेल्या दोन आठवड्यांपासून दूषित पाणी येत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार करूनसुद्धा अजून कोणतेही उपाय केले गेले नाही.
अस्वच्छ पाण्यामुळे आमच्या शाळेत पोटदुखी, कोलेरा, खोकला व तापाचे प्रमाण वाढत चालले आहे. तसेच या दूषित पाण्यासोबत वाहून येणाऱ्या कचऱ्यामुळे शाळेत दुर्गंध पसरतो.
मी आपणास विनंती करतो की आपण लवकरच या समस्येपासून आम्हाला मुक्त करावे व योग्य उपाययोजना करावी.
तसदीबद्दल क्षमस्व.
आपला विश्वासु,
योगेश भाने.
Similar questions
English,
4 months ago
Physics,
4 months ago
Business Studies,
9 months ago
Math,
9 months ago
Math,
1 year ago