India Languages, asked by ayushryadav, 6 months ago

shada Ki ghanti aatmkatha​

Answers

Answered by Umar1324
3

Answer:

hope it's helpful to you

Explanation:

|| पहिली घंटा ||

ज्या व्यक्तीने जून महिन्यामध्ये शाळेचा पहिला दिवस ठेवण्याची कल्पना शोधली त्याला माझा सलाम. काय मस्त वातावरण असते, नाही का? बाहेर काळे कापसासारखे ढग भूमीला भेटण्याच्या ओढीने गडगडून वर्षावत असतात आणि घरी आपण आईपासून दूर जाणार या विचाराने गदगदून रडून आसवे वर्षावतो. बाहेर मस्त थंड वारा वाहत असतो आणि मनातून आपण मात्र जळत असतो. विस्कटलेले केस आई जेव्हा आपले तेल लावून निट बसवत असते तेंव्हाच नेमका खिडकीवर पावसात भिजून विस्कटलेल्या पंखांचा कावळा येतो. सर्व सृष्टी पावसाची आतुरतेने वाट पाहत असते आणि आपण मात्र शाळा भरण्याची घंटा थोडी अजून उशिरा वाजण्याची वाट पाहत असतो. सर्वत्र मृद्गंध पसरलेला असतो आणि आपल्याला मात्र तोंडाला फसलेल्या पावडरचा त्रास होत असतो. या सर्वात साम्य मात्र एकच. पावसाची आणि आपल्या शाळेची होणारी सुरुवात. नविन वर्षातला नवा पाऊस. शाळेजवळ आल्यावर मग आई-बाबा काहीतरी खोटे नाटे कारण सांगून आपल्याला शिक्षिकेच्या हाती सोपवतात. आपण रडत कांगावा करत त्यांच्या जवळ जातो. त्याही आपली समजूत काढत असतात.

थोडा वेळ जातो. अजून काही मुले मुली शाळेत येतात. तोपर्यंत आपले रडणे बंद झालेले असते. गंमत म्हणजे तेंव्हा आपण इतर रडत येणाऱ्या विद्यार्थ्यांना पाहून गालातल्या गालात हसत असतो. बाहेर पाऊस वाढलेला असतो. त्याच्या सरींचा टप-टप आवाज अंगणातल्या प्लास्टिकवरून स्पष्ट ऐकू येत असतो. शाळा भरते. बाई खेळ आणि अभ्यास सुरु करतात. शेजारचा परका मुलगा आपला मित्र बनतो. लाकडाचे विविध आकाराचे ठोकळे, नविन दप्तर, त्यातील नवीन पाटी,खडू, भिंतींवरील रंगीत चित्रे आणि मधल्या सुट्टीतला डबा. सर्वच आपलेसे वाटतात.

मग घंटा वाजते मात्र ती शाळा सुटल्याची. आई-बाबा बाहेर उभे असतात मात्र आपण आपल्या नविन शाळेत एवढे रममाण झालेलो असतो की आता तिथेच रहावेसे वाटते. परंतु निघणे गरजेचे असते. आपण हसतच बाईंचा 'नमस्ते' बोलून निरोप घेतो आणि मग ओढ लागते ती दुसऱ्या दिवसाच्या शाळा भरणाऱ्या घंटेची.

Okay!!!!!

Similar questions