Swachh Bharat Abhiyan in Marathi | Essay on Sundar Bharat Nibandh
Answers
स्वच्छता अभियान याची सुरुवात संत गाडगेबाबा यांनी केली होती. ते स्वतः रस्त्यावरचा कचरा काढून त्याची विलेवाट लावायचे. रोगराई पसरू नये म्हणून ह्या अभियानाची सुरवात झाली होती.
२०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरवात केली. ह्या अभियानाचे प्रतीक म्हणून गांधीजींचा चष्मा हा चिन्ह स्वच्छता अभियानाला दिला गेला. स्वच्छ भारत अभियान हळू हळू पूर्ण देशात पसरले आणि लोक रस्त्यावर येऊन कचरा काढू लागले. काही संघटनाही एकत्र येऊन स्वच्छतेचे महत्व लोकांना पटवून देऊ लागले. ओला व सुका कचरा वेगळा करू लागले. ह्या अभियानाने भारताला स्वच्छच नव्हे तर सुंदरही बनवले आहे. कचरा फक्त कचराकुंडीत टाकावा ही शिकवण ह्या अभियानाने जागृत केली असून लोकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. देशाने ह्या अभियानाला भरगोस प्रतिसाद दिला. ह्या अभियाना अंतर्गत सर्वात स्वच्छ शहर याचा पुरस्कारही जाहीर करण्यात आला होता.
एवढेच नव्हे तर स्वछ भारत अभियान उघड्यावर सौच करण्याचे निर्मूलन करण्यासाठी सुरु करण्यात आले होते. ह्या अभियानाचा अंतर्गत अनेक गावांत शौचालय बांधून देण्यात आले होते. सरकारी अनुदानासाहित लोकांनी केलेल्या मदतीमुळे आज अनेक गावांत शौचालय आहेत. स्त्रियांना व मुलींना उघड्यावर शौच करावा लागत नाही. ' एक पाऊल स्वच्छतेकडे' हि घोषणा करत देशाने खरंच स्वच्छतेकडे निरखून लक्ष दिल्याचे दिसून येते.
हा अभियान खूप यशस्वी झाला यात कसलीही शंका नाही.