English, asked by nargissaifi9750, 1 year ago

Aarsa Nasta Tar Essay in Marathi | Nibandhआरसानसतातरनिबंध

Answers

Answered by AadilAhluwalia
1

आरसा म्हंटल कि सर्वात आधी स्वतःचा चेहरा डोळ्यासमोर येतो. आरसा सर्वांना प्रतिबिंब दाखवतो. आरश्यात पाहून आपल्याला पण कसे दिसतो हे समजतं. आरसा आपल्याला आपण जे आहोत तेच दाखवतं. म्हणूनच आरसा खोटं बोलत नाही असे म्हंटले जाते. आरसा खरेपणाचं प्रतीक मानलं जातं.

काल आरश्यात पाहत होते, अचानक विचार आला जर आरसा नसता तर!

जर आरसा नसता तर आपल्याला स्वतःला पाहता आले नसते. आपण कसे दिसतो, हे कळलेच नसते. महिलांना नेहमी सुंदर दिसवेसे वाटते, पण आरसा नसता तर त्यांना आपल्या सुंदरतेचा अंदाज लावणे जमलेचं नसते. आरसा नसल्यामुळे महिलांना शृंगार करता आला नसता. शृंगाराने नाटल्यावर त्यांना स्वतःला पाहण्याचे सुख मिळाले नसते. आरसा नसता तर आपल्याला चेहऱ्यावर असलेले डाग दिसले नसते. आपल्यात असलेल्य त्रुटीची जाणीव कधी झाली नसती. आपण सुंदर दिसत नाही याचा कमीपणा कोणालाच आला नसता. अरश्याची दाखवल्या नाही तर आपल्या चुका कश्या दिसून येणार? आरसा नसता तर महिलांची खूप तारांबळ उडाली असती. आरसा नसता तर आपल्याला खरे खोटे कळले नसते. आपण समोरच्याचा आरसा बनून त्याचा चुका दाखवून द्याव्या हि संकल्पनाच अली नसती.

नको बाई,

आरसा आहे तेच बरं आहे. अरश्याची आणि अरशासारख्या माणसांची आजचा दिखावी जगात गरज आहे.

Similar questions