English, asked by RINku221, 1 year ago

My School Essay in Marathi | Mazi Shala Essay, Majhi Shala Nibandh

Answers

Answered by fistshelter
98

Answer: माझ्या शाळेचे नाव 'शिवाजी शिक्षण संस्थेचे मल्टिपरपज् टेक्निकल हायस्कूल' असे आहे. माझ्या शाळेत नर्सरी ते पदवी पर्यंतचे शिक्षण उपलब्ध आहे.

माझ्या शाळेची इमारत दुमजली आहे. माझ्या शाळेला मोठे मैदान लाभले आहे. तेथे आम्ही विविध मैदानी खेळ खेळतो तसेच शाळेकडून तेथे विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. माझ्या शाळेत वाचनालय आहे. तेथे वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके आहेत. हे वाचनालय म्हणजे ज्ञानाचा खजिना आहे. शाळेत प्रशस्त प्रयोगशाळा आहे. येथे निरनिराळे वैज्ञानिक प्रयोग आम्हांला शिकवले जातात. तसेच आमच्या शाळेत भोजनगृह आहे. तिथले काका उत्कृष्ट पदार्थ बनवतात. विद्यार्थ्यांना अल्पदरात भोजन मिळते.

माझ्या शाळेत विविध कलागुणांना वाव दिला जातो. विविध स्पर्धा आयोजित करून आम्हाला प्रोत्साहन दिले जाते. नैतिक मूल्यांची शिकवण दिली जाते. आमचे शिक्षक अतिशय प्रेमळ आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांनी आयुष्यात यशस्वी व्हावे म्हणून ते जीवापाड मेहनत घेतात. अशी ही माझी शाळा मला फार फार आवडते.

Explanation:

Answered by yashica123
30

Answer: here's your answer

Explanation:

खरोखरच प्रत्येक लहान मुलाच्या आयुष्यात शाळा ही खूप मोठी भूमिका बजावते कारण शाळेत जाण्यापूर्वी ते मुल घरातल्या छोट्याशा जगात असते. त्याचा बाहेरील मोठ्या जगाशी परिचय होतो तो शाळेमुळेच होतो, म्हणूनच शाळेचे महत्व लहान मुलच्या जीवनात फार असते.

माझी शाळा आमच्या घराजवळच आहे, शाळेत चालत जाण्यास बरोबर बारा मिनिटे लागतात. ही बारा मिनिटे मी जणू काही वा-यावर उडतच पार करतो. परंतु कधी उशीर झाला की बस मधे जव लागत.माझे कित्येक मित्र दूरवरून आमच्या शाळेत येतात आणि त्यांना शाळेच्या बसने यावे लागते. त्यामुळे त्यांना माझा हेवा वाटतो.

आमच्या शाळेत शिस्तीचे महत्व फार आहे, शाळेची पहिली घंटा होते तेव्हा सर्व मुले शाळेच्या फाटकाच्या आत आलेली असली पाहिजेत, दुसरी घंटा होते तेव्हा आपापल्या वर्गात गेली पाहिजेत आणि तिस-या घंटेला प्रार्थना सुरू झाली पाहिजे असा आमच्या मुख्यराध्यापकांचा आग्रह असतो.

आमचे सर्व शिक्षक खूप मनमिळाऊ असून वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भागघेण्यास ते आम्हाला खूप प्रोत्साहन देतात. आमच्यासाठी खास खोखोचे प्रशिक्षणसुद्धाशाळेत चालते. मी स्वतः खोखोच्या संघात असून गेल्या वर्षी आम्हाला आंतरशालिय ढाल मिळाली होती. त्याशिवाय उन्हाळी सुट्टीत आमच्यासाठी पोहण्याची खासशिबिरे आयोजित केली जातात, आमच्या लहानमोठ्या सहली काढल्या जातात. मी दर वर्षी शाळेच्या सहलीला जातो. आईबाबांसोबत सहलीला जाणे आणि बरोबरीच्या मित्रांसोबत शाळेच्या सहलीला जाणे ह्यात खूप फरक आहे. मात्र शाळेच्या सहलीत फार मस्ती करून चालत नाही. मुले एकदा चेकाळली की कुणाचेच ऐकत नाहीत असा आमच्या सरांचा अनुभव आहे.

ह्या शाळेत मी आहे हे माझे मोठे भाग्य आहे असे मला वाटते कारण इथेच मला खुप चांगले मित्र मिळाले. आमच्या शाळेचे ग्रंथसंग्रहालय आणि प्रयोगशाळाही अगदी अद्ययावत आहेत. म्हणूनचमला माझी शाळा खूप आवडते.

Similar questions