विविधभारतीवरून किती भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर हाेतात ?
Answers
विविधभारतीवरून किती भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर हाेतात ?
उत्तर:- " आकाशवाणीच्या विविधभारतीवरून २४ भाषांमध्ये व १४६ बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात. अलीकडच्या काळात आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून रेडिओ मिर्चीसारख्या असंख्य खासगी एफ.एम. सेवा सुरु झाल्या आहेत. 'इंडियन स्टेट ब्रॉड कास्टिंग सर्व्हिसेस कंपनी' असे नामकरण केले व नंतर ८ जुन १९३६ रोजी 'ऑल इंडिया रेडिओ' असे नामकरण केले. स्वतंत्र भारतात AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या अंतर्गत आले. पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून AIR ला 'आकशवानी' असे नाव दिले गेले. आकाशवाणीवर सुरवातीस शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती दिली जात असे. नंतर शेतकरी, युवा, कामगार, महिला, मुले, अश्या सर्वांसाठी विशेष कार्यक्रम सादर केले जाऊ लागले. संगीत ,गीत नाट्यछटा इत्यादी कार्यक्रमांद्वारे मनरंजन करणे, विविध क्षेत्रातील बातम्या देणे. वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे सामाजिक समस्या मांडून लोकशिक्षण करणे. इत्यादी विविध कार्यक्रम विविधभारती द्वारे लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होते.
" विविधभारती " ही आकाशवाणी ची एक प्रमुख प्रसारण सेवा आहे.
भारतामध्ये रेडिओ च्या श्रोत्यांमध्ये सर्वात जास्त ऐकली जाणारी लोकप्रिय सेवा आहे.
विविधभारती ची सुरूवात ३ ऑक्टोंबर१९५७ मध्ये झाली होती. सुरुवातीला याचे प्रसारण केवळ मुंबई आणि मद्रास या दोन च केंद्रावरून होत होते.
परंतु वाढत्या लोकप्रियते आकाशवाणी च्या आणखी केंद्रावरून सुद्धा याचे प्रसारण व्हायला लागले.
विविधभारती " या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे
__
२४ भाषा आणि १४६ बोलीभाषांमध्ये
कार्यक्रम सादर होतात.
यामध्ये मनोरंजक किंवा उपदेशपर कार्यक्रम , राष्ट्रीय भावना जागृती, जनजागृती करणारे, यासारख्या कार्यक्रमांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. त्याचप्रमाणें.. गाणी, विविध कलावंतांच्या..कलाकारांच्या मुलाखती कथा नाटक यांचाही समावेश असतो.
ताज्या बातम्या आणि विविध सुचना ही देणारऱ्या कार्यक्रम सादर केले जातात.
विविध भारती ने आपली लोकप्रियता अजूनही कायम ठेवलेली आहे.