Essay on Autobiography of a cat in Marathi
Answers
Answer:
Sorry dear I am not good at Marathi as my mother tongue is Hindi ...
■■मांजरीचे आत्मवृत्त■■
कसे आहात मित्रांनो?मी तुमची मनी-माऊ 'मांजर' बोलत आहे.आज मी तुम्हांला माझी जीवनकथा सांगणार आहे.
माझा जन्म पुण्याच्या एका एनजीओ मध्ये झाला होता.मी माझ्या तीन भावंडासोबत आणि आईसोबत आनंदाने तिथे राहायची.
एके दिवशी मला, एका माणसाने त्या एनजीओमधून दत्तक घेतले.त्यादिवशी मी माझ्या कुटुंबापासून लांब झाली,म्हणून खूप नाराज होती.
माझ्या मालकाच्या घरी गेल्यावर हळूहळू मी तिकडच्या वातावरणात मिसळू लागली.त्या घरात सगळेजण मला खूप प्रेम करायचे.माझे खूप लाड़ करायचे.माझ्या मालकाचा लहान मुलगा तर मला कुशीत घेऊन झोपायचा.
मी तिथे खूप आनंदात आणि सुखात राहत होती.परंतु एके दिवशी मी खूप आजारी पडले.माझी तबियत इतकी खराब झाली होती की मी जेवत नसत.
बऱ्याच डॉक्टरांकडे नेले तरीही मला काही फरक पडेना.हळूहळू घरातले सगळेजण माझ्यावर वैतागू लागले.ते माझ्यावर लक्ष देत नसत.मला वेळेवर औषध देत नसत.
शेवटी माझ्या मालकाने एक दिवशी रस्त्यावर मला सोडून दिले.मी दोन दिवस रस्त्यावरच राहिली.तेव्हा, एका एनजीओ कर्मचाऱ्याने मला पाहिले आणि मला तो एनजीओमध्ये घेऊन गेला.
आता मी माझ्यासारख्याच माझ्या इतर मित्र-मैत्रिणींसह एनजीओमध्ये आनंदाने राहते.तर अशी होती माझी जीवनकथा.