India Languages, asked by saurabh10571, 10 months ago

Essay on need of biodiversity in Marathi

Answers

Answered by halamadrid
14

■■जैवविविधतेची आवश्यकता■■

आपल्या पृथ्वीवर उपस्थित असलेले वेगवेगळ्या प्रकारचे जीव म्हणजेच जैवविविधता.जैवविविधतेमुळे परिसंस्थेची उत्पादकता वाढते,जैवविविधतेत असलेली प्रत्येक लहान किंवा मोठी प्रजाती महत्वपूर्ण भूमिका निभावते.

जैवविविधता जर जास्त असेल, तर पर्यावरणीय ताणाचा,नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा सामना करण्यासाठी विविध प्रजातींची प्रतिकारशक्ती सुद्धा जास्त असते.

जैवविविधता खूप आवश्यक आहे,कारण मनुष्यासाठी जैवविविधतेचे खूप सारे फायदे आहेत.

जैवविविधतेचा उपयोग औषधनिर्मिती मध्ये होतो.प्राचीन काळापासून औषध बनवण्यासाठी बऱ्याच वनस्पती प्रजातींचा प्रयोग केला जातो.

बांधकाम आणि उर्जानिर्मितीसाठी,वस्त्रोद्योगामध्ये जैवविविधतेची महत्वपूर्ण भूमिका असते.रबर,परफ्यूम,कागद,मेण यासारखे उत्पादने आपल्याला झाडे व वनस्पतींपासून मिळतात.

तसेच जनावरांपासून लोकर,चामडे,रेशीम यासारखे उत्पादने मिळतात.जैवविविधता आपल्याला जेवण उपलब्ध करून देते.

जैवविविधतेमुळे पर्यटन क्षेत्रातसुद्धा वाढ होते.नैसर्गिक वातावरण आणि वेगवेगळ्या प्रकारचे जनावर,पक्षी आणि इतर वन्य जीवन पर्यटकांना संपूर्ण जगातून आकर्षित करतात.जैवविविधतेचा उपयोग अभ्यासासाठी आणि संशोधनासाठी केला जातो.

जैवविविधतेचे संरक्षण वेगवेगळ्या प्राणी व वनस्पति प्रजातींच्या अस्तित्वासाठी आणि त्यांची आनुवंशिकता सुधारण्यासाठी आवश्यक आहे.आपल्या पुढच्या पीढ़ीसाठी जैवविविधतेचे संरक्षण करणे खूप गरजेचे आहे.

Similar questions