India Languages, asked by Mirin7532, 11 months ago

marathi nibandh on samudrakathchi safarr

Answers

Answered by pooja828
2

Answer:

२०१२ चा उन्हाळा आम्हाला खूप महिन्यांपासून खुणावत होता. आमच्या कंपनीमधे Sabbatical vacation ची सुविधा आहे. नोकरीची ७ वर्षे पूर्ण झाली की २ महिन्यांची पगारी सुट्टी मिळते जी १० वर्षे पूर्ण व्हायच्याआत कधीही घेऊ शकतो. जर नाही घेतली तर ती बाद होते. आम्ही दोघेही या सुट्टीसाठी पात्र झालो होतो. अर्थातच जवळजवळ गेलं वर्षभर अगदी आतुरतेने तिची वाट पाहात होतोच. यात अमृतयोग म्हणजे मुलीच्या शाळेची उन्हाळी सुट्टी!! मग काय, आमची गेल्या ६ महिन्यांपासून जोरात तयारी चालू होती. युरोपमधे इटलीतील काही ठिकाणे आपली आपण पहायची, मग १५ दिवसांची एक समुद्रसफर करायची, त्यानंतर भारतात जाऊन आई-वडिल, आप्तेष्टांना भेटायचे आणि मग काही दिवस परत घरी येउन अगदी निवांत आराम करायचा असा एकंदरीत बेत होता. त्याप्रमाणे तिकीटे, माहिती मिळवणे, प्रवास वर्णनांचे वाचन, Travel guides इ. इ. सुरु झालेच.

यातील इटलीचा प्रवास थोड्याफार फरकाने इथे बर्‍याच जणांनी वर्णन केल्याप्रमाणे झाला. त्यामुळे त्याबद्दल फार काही लिहित नाही, पण क्रुझ याविषयी मात्र भरभरून बोलावसं वाटतंय म्हणून हा लेखनप्रपंच.

आम्ही Princess Cruises तर्फे चालविण्यात येणार्‍या Crown Princess ने Venice to Rome असा प्रवास करायचे ठरवले. ग्रीक बेटे हे प्रवासाचे मुख्य आकर्षण होते. याशिवाय Croatia आणि Turkey या देशांमधील काही ठिकाणे होती. परतीच्या मार्गावर परत इटलीतील २ ठिकाणे होती. असा एकंदरित ४ देशांचा प्रवास होता. त्याचे बुकिंग कोणताही एजन्ट न घेता online Princess वरच केले. विसासाठी Italian Consulate मधून Schengen visa घेतला. त्यामुळे कायदेशीर बाबी सर्व पार पडल्या. Turkey मधे over-night stay नव्हता त्यामुळे आणि US चे GC असल्यामुळे विसाची गरज नव्हती. cruiseline ने गेल्या ६ महिन्यांपासुन ही सर्व तयारी करण्यास सांगितले आणि आवश्यक सुचनाही दिल्या. प्रवास महिन्यावर आला असताना ही सर्व माहिती तपासून घेतली. आमचा पहिलाच समुद्रप्रवास होता हा. मला समुद्र आवडतो पण दिवसेंदिवस असं समुद्राच्या मध्यात राहणं कितपत झेपेल ही शंका/भीती होती - शरीराचं एक वेळ ठीक होतं कारण मोशन-सिकनेसचा वगैरे फारसा त्रास होत नाही पण त्याहून महत्त्वाचे म्ह्णजे ४ फुटात कसेबसे पोहता येणार्‍या मला काही emergency आली तर काय ही थोडी भीती होतीच. त्याबद्दलचा एक किस्सा पुढे समजेलच. Happy

Explanation:

████████▒★Mark me as a Brainlist

Similar questions